भारतीय स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये चटण्यांना फार महत्व आहे. अनेक घरांमध्ये सुक्या किंवा ओल्या चटण्या खाल्ल्या जातात. जवसाची सुकी चटणी चवीला उत्तम लागते. ओमेगा-३ फॅटी एसिड्सनी परीपूर्ण असतात. जवस शरीराची सूज कमी करण्यास मदत करते (How To Make Alsi Chutney At Home). हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी जवस फायदेशीर ठरते. ही चटणी खाल्ल्यानं फक्त अन्नाची चव वाढत नाही तर ही चटणी खाल्ल्यानं तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात. (Flax Seeds Chutney For Heart Health)
जनसाची चटणी करण्याची योग्य पद्धत
ही चटणी चवदार असल्यामुळे पौष्टीकतेनं परीपूर्ण असते. गॅसवर कढई ठेवा आणि त्यात जवस घाला. गॅसची आच मंद ठेवा आणि जवस चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्या. जवस भाजताना ते तडतडतात. जवस करपणार नाहीत याची काळजी घ्या, नाहीतर चटणीची चव बिघडते. जवस भाजून झाल्यावर एका ताटात काढून थंड करा.
त्याच कढईत खोबऱ्याचा किस घाला आणि तो सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.त्याचवेळी कढईत जिरे घालून तेही हलकेसे भाजून घ्या. हे सर्व भाजलेले साहित्य जवसासोबत ताटात काढून थंड करा. काही लोक लसूण कच्चाच वापरतात, तर काही लोक त्याला हलके भाजून किंवा तेलात परतून घेतात. तुम्हाला आवडत असल्यास, लसूण पाकळ्या हलक्या भाजून किंवा अगदी कच्च्या देखील वापरू शकता.
भाजलेले जवस, खोबरे आणि जिरे पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्या.त्यात लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घाला. मिक्सरमधून हे मिश्रण छान बारीक करून घ्या. चटणीची पावडर तयार झाली पाहिजे. ही चटणी हवाबंद डब्यात साठवून ठेवा.जेव्हा तुम्ही ही चटणी खाण्यासाठी घ्याल, तेव्हा त्यात थोडेसे तेल शेंगदाणा किंवा तिळाचे तेल घालून खाल्ल्यास त्याची चव अधिक खुलते.
जवसाचे फायदे
जवसामध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (ALA), जे एक प्रकारचे ओमेगा-३ फॅटी ऍसिड आहे, मुबलक प्रमाणात असते.यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. जवसामध्ये असलेले विद्रव्य फायबर शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासही याचा उपयोग होतो.फायबर जास्त असल्याने ही चटणी खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. यामुळे सारखी भूक लागत नाही आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत मिळते. जवसामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात, जे हाडांना बळकट करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
