Join us

How to live long life healthy : रिसर्च-निरोगी दीर्घायुष्यासाठी रोजच्या जेवणातून फक्त हे पदार्थ वगळा; वाढत्या वयातही आजारांपासून लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:41 IST

How to live long life healthy : हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुम्ही काय खाता आणि किती खाता हे माहिती असणं गरजेचं आहे अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कमी खाणारे लोक जास्त दिवस जगतात.

निरोगी दीर्घायुष्य सगळ्यांनाच हवंहवंस वाटतं. नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासानुसार आहारात कॅलरीज इन्टेक कमी केल्यानं व्यक्ती दीर्घकाळ  जगू शकते. कॅलरी इन्टेक कमी केल्यानं थायमस ग्रंथी अधिक चांगल्या पद्धतीनं काम करते. यामुळे जास्त जगण्याची शक्यता वाढते. (Eating less calorie food can increase your age study revealed)

हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुम्ही काय खाता आणि किती खाता हे माहिती असणं गरजेचं आहे . अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कमी खाणारे लोक जास्त दिवस जगतात. (How to live long life healthy) येल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की कॅलरी इन्टेक कमी केल्यानं इम्यून सिस्टिम अधिक चांगल्या प्रकारे काम करते. (Things to Stop Doing If You Want a Longer Life)

या  अभ्यासात तरूणांनी जवळपास १४ टक्के कमी कॅलरीज घेतल्या. यामुळे त्यांची थायमस ग्रंथी अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू लागली. थायमस ग्रंथी हद्याच्यावर असते आणि आजारांशी लढत असलेल्या टी सेल्सचं उत्पादन करते. थायमोसिन नावाच्या हार्मोन्सचा स्त्राव यामुळे होतो. थायमस ग्रंथी कमी होत गेल्यानं माणसांमध्ये वृद्धत्व येतं. लहान मुलांमध्ये ही ग्रंथी मोठी असते. (Eating less calorie food can increase your age study)

वाढलेली शुगर लेव्हल 120 मिनिटात घटवेल हा खास ज्यूस; डायबिटीस कंट्रोलचा उत्तम उपाय, तज्ज्ञांचा दावा

या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या डायटिशियन  विश्व दिव दीक्षित यांनी सांगितले की, दिर्घकाळ जगण्यासाठी ही ग्रंथी कमी होण्यापासून वाचावायला हवं. संशोधकांच्यामते कॅलरीज इन्टेक कमी केल्यानं शरीरातील इन्फ्लेमेशन कमी केलं जाऊ  शकतं. या अभ्यासात २६ ते ४७ वर्ष वयोगटातील २३८  सड पातळ लोकांचा समावेश करण्यात आला होता. यातील दोन तृतीयांश लोकांना त्यांच्या कॅलरीज कमी करण्यास सांगण्यात आलं. या अभ्यासात सामिल असलेल्यांचे बॉडी वेटही मोजण्यात आले. 

संशोधकांनी २ वर्षानंतर जेव्हा लोकांचे एमआरआय स्कॅन केले तेव्हा दिसून आलं की, त्यांनी आपल्या आहारात कॅलरीजचं प्रमाण कमी केलं होतं. त्यामुळे थायमस ग्रंथी व्यवस्थित काम करत होत्या. येस सेंटर फॉर रिसर्च ऑन एजिंगच्या  सीनियर ऑथर प्रोफेसर दीक्षित यांनी सांगितले की, ज्या लोकांनी  २ वर्षांपर्यंत कमी कॅलरीज इन्टेक घेतले त्याच्यांत टी- सेल्सचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे वृद्ध्त्वाची लक्षणं कमी प्रमाणात दिसून आली. 

 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य