बहुतांश शाकाहारी लोकांच्याा शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी प्रमाणात दिसून येते. शरीर आणि मेंदू दोन्हीही ॲक्टीव्ह राहण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ अतिशय गरजेचे असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी प्रमाणात असेल तर मूड स्विंग होणे, हातापायांना मुंग्या येणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा येते, निर्णयक्षमता कमी होणे, डिप्रेशन येणे असे कित्येक त्रास होतात. हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढवायला हवं. त्यासाठी डाॅक्टरांनी काही साधे सोपे उपाय सांगितले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की दही जर तुम्ही योग्य पद्धतीने खाल्लं तर नक्कीच त्याच्यातले बॅक्टेरिया शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढविण्यासाठी मदत करतात (how to improve vitamin b 12 level?). पण ९० टक्के लोक दही चुकीच्या पद्धतीने खातात. म्हणूनच आता दही खाण्याची योग्य पद्धत पाहा जेणेकरून व्हिटॅमिन बी १२ वाढविण्यासाठी मदत होऊ शकते..(how to get rid of vitamin b 12 deficiency?)
शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढविण्यासाठी दही कसं उपयुक्त ठरू शकतं?
१. दही खाताना बरेच लोक एक चूक करतात आणि ती म्हणजे दह्यामध्ये ते साखर किंवा मीठ घालून घातात. साखर किंवा मीठ असे कोणतेही पदार्थ जर दह्यामध्ये घातले तर दह्यामधले बॅक्टेरिया नष्ट होतात. हेच बॅक्टेरिया शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढविण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे दही खाताना त्यात साखर, मीठ घालू नका. ते जसं असतं तसंच खा.
२. दही खाताना अनेक लोक आणखी एक चूक करतात आणि ती म्हणजे वरचं घट्ट दही खायचं आणि दह्यातलं पाणी मात्र तसंच राहू द्यायचं. काही जणं घरी लावलेल्या दह्यातलं जास्तीचं पाणी टाकून देतात आणि फक्त घट्ट दही खातात.
गुलाबाच्या रोपावर बारीक किडे, मुंग्या दिसतात? पानांनाही छिद्रं पडली? ४ उपाय- रोप पुन्हा जोमात वाढेल
असं करणं टाळायला हवं. पाणी आणि घट्ट दही दोन्ही व्यवस्थित एकत्र करून खा. त्यातूनच शरीराला जास्त पौष्टिक घटक मिळतात.
३. तिसरी गोष्ट म्हणजे दही कधीही रात्री खाऊ नका. दही खाण्याची योग्य वेळ दुपारचीच असते. कारण शरीरातल्या पित्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी दुपारीच दही खाणं जास्त फायद्याचं ठरतं.ही माहिती डॉक्टरांनी maharashtrajagran या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
