Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चष्म्याला काही दिवसांतच कराल बाय बाय! रोज 'हे' काम करा- नजर होईल तेज

चष्म्याला काही दिवसांतच कराल बाय बाय! रोज 'हे' काम करा- नजर होईल तेज

How To Improve Eyesight: चष्म्याचा कंटाळा आला असेल तर पुढचे काही दिवस नियमितपणे हा एक सोपा उपाय करून पाहा...(exercise for eyes to improve vision)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 17:01 IST2025-06-24T17:00:57+5:302025-06-24T17:01:37+5:30

How To Improve Eyesight: चष्म्याचा कंटाळा आला असेल तर पुढचे काही दिवस नियमितपणे हा एक सोपा उपाय करून पाहा...(exercise for eyes to improve vision)

how to improve eyesight, exercise for eyes to improve vision, eye exercises to help you get rid of spectacles naturally | चष्म्याला काही दिवसांतच कराल बाय बाय! रोज 'हे' काम करा- नजर होईल तेज

चष्म्याला काही दिवसांतच कराल बाय बाय! रोज 'हे' काम करा- नजर होईल तेज

Highlightsपहिला उपाय म्हणजे सगळ्यात आधी तर दोन्ही तळहात एकमेकांवर घासा आणि नंतर ते दोन्ही तळवे डोळ्यांना लावा.

चष्मा लागणं ही आता खूपच सामान्य बाब झाली आहे. चाळिशी जवळ आली तरी चष्मा लागलेला नाही, अशा व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्या आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही, शिवाय कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्क्रिनचा वापर खूप जास्त वाढला आहे. आकाशाकडे, हिरवळीकडे नजर लावून पाहाणं, खूप दूरवर नजर लावून पाहाणं हे सगळंच आता कमी झालेलं आहे. त्याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतोच. त्यामुळेच हल्ली चष्मेबहाद्दुरांचं प्रमाण वाढलं आहे. काही लोक खूप स्टायलिश पद्धतीने चष्मा कॅरी करतात. पण काही लोकांना मात्र तो मुळीच आवडत नाही (How To Improve Eyesight?). तुम्हालाही चष्मा लावणं आवडत नसेल किंवा नजर तेज करायची असेल (exercise for eyes to improve vision)  तर या काही गोष्टी काही दिवस नियमितपणे करून पाहा.(eye exercises to help you get rid of spectacles naturally) 

 

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी...

डोळ्यांची दृष्टी नैसर्गिकपणे वाढवून चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी काय करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ योग अभ्यासकांनी officialcanwinn या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी साधे सोपे ४ उपाय सुचवले आहेत.

Trigeminal Neuralgia: सलमान खानला झालेल्या आजाराला ‘suicide disease’ का म्हणतात? कोणाला त्याचा धोका जास्त

पहिला उपाय म्हणजे सगळ्यात आधी तर दोन्ही तळहात एकमेकांवर घासा आणि नंतर ते दोन्ही तळवे डोळ्यांना लावा. तळहातांमध्ये तयार झालेली उष्णता डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.

रातराणीच्या रोपाला फुलांचा बहर येण्यासाठी ३ गोष्टी!  मंद, धुंद सुगंधाने भरून जाईल घर.. 

यानंतर बोटाच्या टोकाला थोडी लाळ लावावी आणि ती काजळ लावल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांना लावावी. आपले अनेक विकार कमी करण्यासाठी लाळ उपयुक्त ठरते. त्यामुळेच तर सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता पाणी प्यावं, असं सल्ला काही याेगतज्ज्ञ नेहमीच देतात.

 

त्यानंतर हाताच्या पहिल्या ३ बोटांपैकी एक बोट एका डोळ्याच्या नाकजवळ असणाऱ्या कोपऱ्यावर, दुसरे बोट कपाळावर दोन्ही भुवयांच्या मधे आणि तिसरे बोट दुसऱ्या डोळ्याच्या नाकाजवळ असणाऱ्या कोपऱ्यावर ठेवा आणि तिथल्यातिथेच ५ वेळा बोट क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज या पद्धतीने गोलाकार फिरवा.

Health Tips: डॉक्टर सांगतात कॅन्सरचा धोका कमी करणारे 'हे' पदार्थ रोज खायलाच हवेत 

त्यानंतर बोटाच्या टोकांनी डोळ्यांच्या आसपासचा भाग, कपाळ याठिकाणी १५ ते २० सेकंदासाठी टॅपिंग करा. यानंतर पुन्हा दोन्ही तळहात एकमेकांवर घासून हातांची उष्णता डोळ्यांना द्या. काही महिने नियमितपणे हा उपाय केल्यास चष्म्याचा नंबर कमी होईल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 


 

Web Title: how to improve eyesight, exercise for eyes to improve vision, eye exercises to help you get rid of spectacles naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.