Dengue Symptoms : पावसाळ्यात साथीचे वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. डेंग्यू, मलेरिया हे आजार तर खूप जास्त होतात. तसेच सर्दी-खोकला, ताप या समस्याही होतात. पण बऱ्याच लोकांना सामान्य ताप आणि डेंग्यूच्या तापातील फरक माहीत नसतो. अशात ते दुर्लक्ष करतात आणि तब्येत आणखी जास्त बिघडते. त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांबाबत सगळ्यांनाच माहिती असली पाहिजे. डेंग्यू आणि साध्या तापात काय फरक असतो तेच पाहुयात.
डेंग्यू एक व्हायरल.. इन्फेक्शन आहे जे एडीज डास चावल्यामुळे होतं. डेंग्यू झाल्यावर ताप अधिक वाढतो. पण व्हायरल ताप असेल तर तापमान डेंग्यू इतकं जास्त नसतं. त्याशिवाय हाडांमध्ये किंवा जॉइंट्समध्ये वेदना होत असेल तर आपल्याला डेंग्यू लागण झालेली असू शकते.व्हायरल.. ताप आल्यावर शरीरात वेदना होतात, पण त्याची इंन्टेसिटी डेंग्यू इतकी नसते.
डेंग्यूची सामान्य लक्षणं
जर ताप जास्त आला आणि तापानंतर २ ते ४ दिवसात शरीरावर लाल चट्टे दिसत असतील, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही लक्षणं डेंग्यूकडे इशारा करतात. सतत थकवा जाणवणे हे सुद्धा डेंग्यूचं लक्षण असू शकतं. डेंग्यूच्या लक्षणांमध्ये मळमळ आणि उलटी यांचाही समावेश असतो.
नाकातून किंवा हिरड्यांमध्ये रक्त येणे हे सुद्धा डेंग्यूचं एक लक्षण आहे. त्याशिवाय हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, भूक न लागणे हाही डेंग्यूचा संकेत असू शकतो. जर आपल्याला सोबतच ही सगळी लक्षणं दिसत असतील तर जराही उशीर न करता टेस्ट करा आणि योग्य ते उपचार घ्या.