Join us

दातांवर पिवळा थर आलाय? नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 13:36 IST

How To Get White Teeth : (Teeth care Tips) नारळाचे तेल दात चमकवण्यासाठी उत्तम आहे. नारळाचे तेल प्लाक कमी  करण्यासाठी, हिरड्यांची सूज रोखण्यासाठी आणि श्वासांचा दुर्गंध कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

सतत चहा प्यायल्याने,  दात व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे दातांवर पिवळा थर जमा होतो आणि दात घाणेरडे दिसू लागतात. जर तुमचे दात पिवळे असतील तर तुम्हाला स्माईल देतानाही विचार करावा लागतो.  (Oral Health Care Tips) हसताना लोकांचे लक्ष  दाताकडे गेले आणि दात पिवळे झाले असतील तर अवघडल्यासारखं होतं. आयुर्वेद तज्ज्ञ कपिल त्यागी यांच्या मते, बीडी, तंबाखूमुळे दातांवर फक्त  पिवळेपणा येत नाही. दात कमकुवत होतात, हिरड्यांमधून रक्त येतं आणि दात पडू लागतात. दात पडण्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात. दात पांढरे करण्यासाठी तुम्ही गुटका, तंबाखू खाणं सोडून द्यायला हवं. याव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला घेऊन दातांवर  नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. (How To Remove Tarter On Teeth Naturally)

नारळाचे तेल दात चमकवण्यासाठी उत्तम आहे. नारळाचे तेल प्लाक कमी  करण्यासाठी, हिरड्यांची सूज रोखण्यासाठी आणि श्वासांचा दुर्गंध कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते.  नारळाच्या तेलाने तुम्ही ऑईल पुलिंगसुद्धा करू शकता. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. ऑईल पुलिंगने प्लाक कमी करण्यास मदत होते आणि दात चमकदार दिसतात.

दात आणि हिरड्यांसाठी नारळाच्या तेलाचे फायदे

हा एक स्वस्त सोपा उपाय आहे  ज्यात व्हाईटनिंग उपचार होण्यास मदत होते.  घसा खवखवत नाही. फाटलेल्या ओठांची समस्या उद्भवत नाही. तोंडातून दुर्गंधही येत नाही. यात कोणतेही हानीकारक केमिकल्स नसतात. तोंडातील सूज कमी होण्यास मदत होते. हिरड्यांमधून रक्त येत नाही.

नारळाच्या तेलाने दात पांढरेशुभ्र ठेवण्यासाठी १ चमचा तेल आपल्या तोंडात ठेवा ५ ते १० मिनिटं आपल्या तोंडात फिरवा. व्यवस्थित तेल फिरवा जेणेकरून  दात आणि हिरड्या चांगल्या राहतील. त्यानंतर पाण्याने गुळण्या करा.

नारळाच्या तेलात हळद मिसळा

हळदीत एंटी बॅक्टेरिअल आणि एंटीमायक्रोबियल गुण असतात. ज्यातील करक्यूमिन दातांसाठी फायदेशीर ठरते. अर्धा चमचा हळद ५ ते ६ थेंब पाण्यात मिसळून नारळाच्या तेलाबरोबरही मिसळा. या मिश्रणाचा टुथपेस्टप्रमाणे वापर करून दात स्वच्छ करा. चांगल्या परिणामांसाठी ५ मिनिटं दातांवर तसंच लावून ठेवा. नंतर पाण्याने ब्रश करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य