Join us

रात्री लवकर झोप येतच नाही, तासनतास पडून असता? ४ टिप्स, पडल्याबरोबर शांत झोप लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 19:09 IST

How To Get Sleep Early : लवकर जेवा, जेवण झाल्यावर लगेच झोपणं तब्येतीला बरे नाही.

सध्याच्या स्थितीत झोप न येणं ही मोठी समस्या बनलीये. दिवसभराच्या कामानंतर दमून घरी आल्यानंतरही शांत झोप लागत नाही. फोनमध्ये व्हिडिओ पाहण्यात अर्धावेळ निघून जातो. झोप पूर्ण न झाल्यानं दिवसभर उत्साही वाटत नाही.  जर तुम्हाला रोज रात्री झोप येत नसेल आणि तुम्ही तासन् तास अंथरुणावर पडून राहता तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये.(How to get sleep early)  कारण झोपेची कमतरता तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. रोज शांत झोप लागण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला रात्री शांत झोप लागेल आणि दिवसभरही फ्रेश वाटेल.  (How To Train Yourself To Go To Sleep Earlier 4 tips for sleep quickly)

​​​​​​जेवल्यानंतर लगेच झोपू नका

जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपायला गेलात तर ते तुमच्यासाठी योग्य नाही. कारण त्यामुळे अन्न पचायला त्रास होतो आणि तुम्हाला रात्री झोपही लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला रात्री चांगली झोप घ्यायची असेल तर तुम्ही झोपण्याच्या ४ तास आधी अन्न खावे. असे केल्याने तुम्हाला चांगली झोप लागेल.

झोपण्याआधी अंघोळ करा

जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुम्ही एक सोपा मार्ग अवलंबू शकता, तो म्हणजे अंघोळ. झोपण्यापूर्वी नेहमी आंघोळ करा. त्यामुळे खूप फरक पडतो.रात्री आंघोळीसाठी कोमट पाणी वापरू शकता. असे केल्याने तुम्हाला चांगली झोप लागेल.

ना जीम, ना डाएट;  एका आठवड्यात वजन घटेल; वेट लॉस कोचचा खासचा फॉर्म्यूला

जास्त विचार करू नका

उद्या काय करायचं किंवा उद्याचा दिवस कसा जाईल याचा विचार करत तासनतास घालवू नका. झोपताना शक्यतो संपूर्ण डोकं रिलॅक्स ठेवून डोळे बंद करून पडून राहा. कारण तुम्ही जितका जास्त विचार कराल तितकावेळ मेंदू अधिक कार्यरत राहील आणि झोप लवकर येणार नाही. 

गरजेपेक्षा जास्त खाऊ नका

जास्त खाणे आणि अल्कोहोल पिणे, रात्री उशिरा त्यांचे सेवन करणे देखील तुमच्या झोपेच्या पद्धतीमध्ये व्यत्यय आणते. अल्कोहोलचे सेवन केल्याने तुम्हाला अवेळी झोप येते आणि जेव्हा रात्री झोपण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला झोप येण्यास त्रास होतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य