Join us

जेवण झाल्या झाल्या नेहमीच टॉयलेटला जावं लागतं? जाणून घ्या कारण आणि त्यावर उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:29 IST

Pooping after every meal : ही समस्या जर नेहमीच होत असेल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काय करावं हे आपण जाणून घेणार आहोत.

Pooping after every meal : बरेच लोक असे असतात ज्यांना जेवण केल्या केल्या टॉयलेटला जाण्याची गरज पडते. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या होत असेल तर ही आरोग्यासंबंधी एक मोठी गडबड असल्याचा संकेत आहे. ही समस्या जर नेहमीच होत असेल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काय करावं हे आपण जाणून घेणार आहोत.

काय सांगतात एक्सपर्ट?

न्यूट्रिशनिस्ट शिल्पा अरोरा यांनी इन्स्टा हॅंडलवर एक व्हिडीओ शेअर केला हे. ज्यात त्यांनी सांगितलं की, 'नेहमीच जेवणानंतर जर तुम्हाला टॉयलेटला जाण्याची गरज पडत असेल तर या आयबीएस म्हणजे इरिटेबल बाउल  सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome) असं म्हटलं जातं. या स्थितीत नेहमीच लोकांना गॅस, डायरिया आणि अपचन या समस्यांचा सामना करावा लागतो. सोबतच शरीरात पोषक तत्वही कमी होऊ लागतात.

कशी कराल समस्या दूर?

इरिटेबल बाउल सिंड्रोमची समस्या दूर करण्यासाठी एक्सपर्टनी काही खास उपाय सांगितले आहे. न्यूट्रिशनिस्ट शिल्पा अरोरा यांच्यानुसार, सगळ्यात आधी तणाव घेणं किंवा चिंता करणं सोडा. जास्त स्ट्रेसमुळे आयबीएसची लक्षणं जास्त वाढतात. सगळ्यात आधी तुम्ही कॉफी पिणं बंद करावं. आयबीएसमध्ये कॉफी पित असाल तर गट हेल्थ आणखी जास्त बिघडू शकते. तसेच न्यूट्रिशनिस्टनी डेअरी प्रोडक्ट्स आणि ग्लूटेन टाळण्यासही सांगितलं  आहे.

या गोष्टींचाही मिळेल फायदा

आयबीएसची समस्या दूर करण्यासाठी एक्सपर्ट केळी खाण्याचा सल्ला देतात. केळींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. तसेच रताळ्यामध्येही फायबर भरपूर असतं. तसेच यात व्हिटामिन सी आणि बीटा-कॅरोटीन सुद्धा भरपूर असतात. जे आयबीएसची समस्या दूर करतात.

इतकंच नाही तर न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, आयबीएसची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही दही भातही खाऊ शकता. यानं पोट शांत होईल आणि आराम मिळे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स