डोळ्यांना चष्मा नको वाटतो, चश्म्यामुळे नाकावर खुणा उमटतात अशी बऱ्याचजणांची समस्या असते. काही सोपे व्यायाम करून तसंच खाण्यापिण्यात बदल करून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीनं असा एक उपाय शोधलाा आहे. ज्यामुळे रेटीनाचे नर्व्स ट्रॅक करून आरोग्याच्या समस्यांची माहिती मिळू शकते. मायोपिया. ड्राय आय सिंड्रोम आणि ग्लुकोमा यांसारख्या डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. (How To Get Rid Of Glasses Naturally)
जर तुम्हाला वयाच्या चाळिशीत किंवा त्याआधीच डोळ्यांच्या समस्या उद्भवत असतील किंवा तुम्हाला धुसर दिसत असेल किंवा डोकं दुखत असेल तर ग्लुकोमा या आजाराची सुरूवात असू शकते. शुगर पेशंट्सनी हे आजार टाळण्यासाठी अजून काळजी घ्यायला हवी. डायबिटीसच्या आजारानं जगभरातील सव्वा कोटीपेक्षा जास्त लोक त्रस्त आहेत.
मायो क्लिनिकच्या रिर्पोटनुसार जर तुम्हाला चष्मा काढायचा असेल तर अधुनिक शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम उपाय आहे. यात लेझरच्या साहाय्यानं कॉर्नियाचा आकार बदलला जातो. हे अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय आहे. ज्यांचा कॉर्निया पातळ असतो त्यांच्यासाठी हा पर्याय निवडला जातो. ही एक प्रगत आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धत आहे. जर तुमचा नंबर खूप जास्त असेल तर डोळ्यात कायमस्वरूपी लेन्स बसवली जाते. (Ref)
डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घरगुती उपाय कोणते?
डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता जसं की सकाळी आणि संध्याकाळी 30 मिनिटं प्राणायम करा. अनुलोम-विलोम आणि भ्रामरी हे व्यायामसुद्धा डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. डोळे चांगले ठेवण्यासाठी महा त्रिफळा घृत पिणं फायदेशीर ठरतं. 1 ग्लास दूधासोबत 1 चमचा हे चूर्ण घ्या. दिवसातून 2 वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.
एलोवेरा ज्यूस, आवळ्याचा ज्यूस डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला तुमचे डोळे चांगले ठेवायचे असतील तर नेहमी मोबाईल वापरण्याची सवय सोडायला हवी. योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितलेले उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. गाजर, रताळे, स्ट्रॉबेरी, आवळ्याचे सेवन डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
