अन्हेल्दी लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाशी सबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. अनेकांना पोट साफ न होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ज्यामुळे पचनक्रिया पूर्ण बिघडते. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी पचनक्रिया चांगली राहणंही महत्वाचं असतं. (Drink Castor Oil With Water to Get Relief From Constipation)
पोट फुगणं, भूक न लागणं ही पचनक्रिया बिघडण्याचे संकेत देतात. थंडीच्या दिवसांत अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या उद्भवते. बराचवेळ जोर लावूनही आतड्यातील मल बाहेर निघत नाही. अनेकांना पोटाशी संबंधित समस्या असतील तर एरंडेल तेल गुणकारी ठरू शकते. (How To Get Rid Of Constipation)
आयुर्वेदानुसार एरंडेल तेल आतड्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरते. याचा योग्य वापर करणं गरजेचं असतं. एरंडेल तेल शरीरात जमा झालेली घाण साफ करण्यास मदत करते. या तेलानं पोट हलकं राहतं. अनेक वर्षांपासून हा उपाय केला जात आहे. एरंडेल तेलाचा वापर कसा करायचा समजून घेऊ.
पचनक्रिया कशी चांगली ठेवावी?
पचनक्रिया एक्टिव्ह ठेवण्यासाठी फक्त अन्न पचवावं लागत नाही तर खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्व पुरेपूर मिळायलासुद्धा हवीत. हा उपाय पोटातील क्रियाशिलता सुधारण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार गॅस, एसिडीटी, अचपनाच्या समस्या उद्भवल्यास शरीरात जमा झालेली घाण, विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर पडणं गरजेचं असतं. ज्यामुळे चेहरा टवटवीत दिसतो आणि त्वचाही चांगली दिसते. त्वचेचा पोत सुधारतो आणि भूकही चांगली लागते.
एरंडेल तेलाचा वापर कसा करावा?
एरंडेल तेल गॅसेसचा त्रास दूर करण्यास प्रभावी ठरतो. एरंडेल तेल आतड्यांची व्यवस्थित सफाई करते आणि पचनक्रिया चांगली ठेवते. एरंडेल तेलाचे सकाळी उठल्यानंतर गरम पाणी किंवा गरम दुधासोबत सेवन केल्यानं चांगला परीणाम दिसून येतो. एकावेळी २ ते ३ चमचे तेलाचे सेवन उत्तम मानले जाते. ज्यामुळे ३ ते ५ तासात पोट नैसर्गिकरित्या साफ होते. रात्री हे तेल घेऊ नये कारण यामुळे वारंवार टॉयलेटला जावं लागू शकतं. म्हणून आठवड्यातून १ किंवा २ वेळा हे तेल घ्या.
