Join us

पावसाळ्यात रात्री घरभर डास फिरतात-चावतात कडकडून? ५ सोपे उपाय- डास राहतील घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 12:47 IST

How to get rid from mosquito at home : वेळीच डासांना घरात येण्यापासून रोखलं नाही तर या आजारांचं प्रमाण वाढतं. काही जणांना डासांच्या स्प्रेच्या वासाचा खूप त्रास होतो तर काहींना गुड नाईट कॉइलच्या धुराची एलर्जी असते.

पावसाळ्याच्या दिवसात घरात डासांसह इतर किटक दिसायला सुरूवात होते. खासकरून ज्या ठिकाणी पाणी साचलं असेल तिथे जास्त डासांची निर्मिती होते. यामुळे मलेरिया, डेंग्यू असे साथीचे आजार पसतातत. (Controlling Mosquitoes at Home) लहान मुलांना ताप, सर्दी होणं अशी लक्षणं दिसतात. वेळीच डासांना घरात येण्यापासून रोखलं नाही तर या आजारांचं प्रमाण वाढतं. काही जणांना डासांच्या स्प्रेच्या वासाचा खूप त्रास होतो तर काहींना गुड नाईट कॉइलच्या धुराची एलर्जी असते. अशा स्थितीत काही सोपे घरगुती उपाय तुमचं काम सोपं करू शकतात जेणेकरून एकही डास घरात येणार नाही. (How to get rid from mosquito at home)

तुळस

तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे डासांना घालवण्यासाठी तुळशीचे तेल देखील एक प्रभावी घरगुती उपाय आहे. तुळशीची पाने बारीक करून त्याचा रस काढून शरीरावर लावल्याने डास चावत नाहीत. याशिवाय तुळशीचे तेलही बाजारात उपलब्ध आहे. दिवा लावूनही डास घरात जात नाहीत.

कापूर जाळा

संध्याकाळी घरात डास शिरतात. संध्याकाळच्या वेळी संपूर्ण घरात कापूर लावला आणि अर्ध्या तासासाठी सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवल्या तर डास येत नाहीत. तसेच घरात ताजेपणा जाणवेल

लसूण

ला

लसणाच्या वासानेही डास पळतात, लसूण बारीक करून त्याचा रस काढून रात्री झोपण्यापूर्वी अंगावर लावा आणि हवे असल्यास लसणाच्या रसाची फवारणीही करू शकता. यापासून डास पळून जातील.

लिंबाचा रस

मॉस्किटो रिपेलेंट रिफिल संपल्यावर त्यात लिंबाचा रस निलगिरीच्या तेलात चांगले मिसळून भरा. यापासून डासही दूर पळतात. हे मिश्रण झोपण्यापूर्वी शरीरावरही लावता येते.

पुदीना

पुदिन्याचा वास देखील डासांना आवडत नाही. पुदिन्याच्या पानांचा अर्क घरात शिंपडा किंवा झोपण्यापूर्वी अंगावर लावा. यामुळे देखील डास होत नाहीत. याशिवाय मोहरीच्या तेलात सेलेरी पावडर मिसळून नंतर खोलीत उंचीवर ठेवा. त्याच्या वासानेही डास खोलीत येत नाहीत. याशिवाय तुम्ही डासांना घालवण्यासाठी काळ्या मिरीचं आणि कडूलिंबाचं पाणीही स्प्रे बॉटलनं शिंपडू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य