Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दातांना कीड लागली-मध्येच दाढ दुखते? किचनमधला 'हा' पदार्थ चावून खा, दातदुखी होते कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:41 IST

How To Get Rid From Cavity : दात साफ न ठेवणं, तोंडात बॅक्टेरिअल इन्फेक्शन, गोड पदार्थ जास्त खाणं यामुळे आरोग्याशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवत आहेत.

आपले दात कसे दिसतात यावर आत्मविश्वास अवलंबून असतो.  जर तुम्हाला दातांशी संबंधित समस्या असतील वरून दात चांगले दिसत असले तरी खालच्या बाजूनं किड लागतील असेल तर  दातांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बऱ्याचजणांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दात साफ न  ठेवणं, तोंडात बॅक्टेरिअल इन्फेक्शन, गोड पदार्थ जास्त खाणं यामुळे आरोग्याशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवत आहेत. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारे काही पदार्थ वापरून तुम्ही दातांचे आरोग्य चांगले ठेवू शकता. (How To Get Rid From Cavity)

लवंग

छोटी दिसणारी लवंग आरोग्याला बरेच फायदे देते. पूजेच्या सामानापासून ते किचनचे सौंदर्य वाढवण्यासाठी बऱ्याच कामांसाठी लवंगाचा वापर केला जातो. लवंगात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात  ज्यामुळे दातांच्या वेदना कमी होतात आणि दातांची किड निघून जाण्यासही मदत होते. लवंगाचे तेल किड असलेल्या ठिकाणी कापसाच्या साहाय्यानं लावा. त्यानंतर गुळण्या करा.

हा उपाय केल्यानं काही दिवसांत दातांतील किड निघून जाईल आणि दात दुखीच्या वेदनांपासूनही आराम मिळेल. लवंगात युजेनॉल नावाचे  सक्रिय रसायन असते जे नैसर्गिक भूल देण्याचे काम करते. लवंग किंवा लवंगाचे तेल दातात धरल्यामुळे तिथल्या वेदना काहीवेळासाठी कमी होतात. (Ref)

लवंगातील घटक दातांमधील किड वाढवणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास मदत करतात. लवंगातील एंटी इन्फ्लामेटरी गुण हिरड्यांची सूज कमी करतात. अख्खी लवंग दुखणाऱ्या दातांखाली धरल्यांन त्यातील अर्क हळूहळू बाहेर निघतो आणि आराम मिळतो. लवंग हा तात्पुरता उपचार आहे. जर तुमचा दात रोजच दुखत असेल आणि जास्त पोकळ झाला असेल तर डॉक्टरांकडून फिलिंग करून घेणं गरजेचं आहे.

लसूण

लसूण किचनमध्ये असलेला एक असा पदार्थ आहे ज्याच्या सेवनानं फक्त अन्नाची चव वाढत नाही तर तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात. लसणातील एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुण पेनकिलर ठरतात. ज्यामुळे दातांच्या वेदना आणि किडीपासून आराम मिळतो. दातांची किड दूर करण्यासाठी कच्चा लसूण चावून खा किंवा लसणाचे  तेल किड लागलेल्या भागावर लावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Tooth decay? Use cloves and garlic for quick relief: Lokmat

Web Summary : Cloves and garlic, readily available in the kitchen, can help relieve tooth decay and pain. Cloves possess antibacterial properties, while garlic acts as a natural painkiller due to its antifungal and antibacterial qualities. Regular dental checkups are still important.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल