lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How to Get Relief From Urine Infection : उन्हाळी लागणं २ मिनिटात बंद करतील ५ सोपे उपाय; जळजळ, खाज अवघड जागेचं दुखणं कायमचं राहिल लांब

How to Get Relief From Urine Infection : उन्हाळी लागणं २ मिनिटात बंद करतील ५ सोपे उपाय; जळजळ, खाज अवघड जागेचं दुखणं कायमचं राहिल लांब

How to Get Relief From Urine Infection : उन्हाळ्यात लघवी करताना खूप जळजळ होते? ५ उपाय, त्रासदायक युरिन इन्फेक्शन राहिल लांब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 02:34 PM2022-03-22T14:34:05+5:302022-03-22T14:38:08+5:30

How to Get Relief From Urine Infection : उन्हाळ्यात लघवी करताना खूप जळजळ होते? ५ उपाय, त्रासदायक युरिन इन्फेक्शन राहिल लांब

How to Get Relief From Urine Infection : These home remedies get rid of urin infection | How to Get Relief From Urine Infection : उन्हाळी लागणं २ मिनिटात बंद करतील ५ सोपे उपाय; जळजळ, खाज अवघड जागेचं दुखणं कायमचं राहिल लांब

How to Get Relief From Urine Infection : उन्हाळी लागणं २ मिनिटात बंद करतील ५ सोपे उपाय; जळजळ, खाज अवघड जागेचं दुखणं कायमचं राहिल लांब

वाढत्या उन्हाळ्यात तब्येतीच्या अनेक समस्या उद्भवतात. (Summer Care Tips)  त्यातल्या त्यात बायकांचे सांगता न येणारे त्रास गरमीच्या दिवसात वाढण्याची शक्यता असते. पाणी कमी पिणं, सतत उन्हात फिरणं, अनियमित जीवनशैली, स्वच्छतेचा अभाव यांमुळे आरोग्याच्या समस्या वाढत जातात. (Urine infection in women) युरिन इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा जळजळ. (Urinary Tract Infection)  पुरुषांपेक्षा महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो.

पाणी नीट न प्यायल्याने आणि जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्यानेही युरिन इन्फेक्शन होते. याशिवाय मधुमेह, गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीच्या काळातही युरिन इन्फेक्शन होते. दुपारी किंवा रात्रीच्यावेळी हा त्रास जाणवल्यानंतर बरं वाटावं म्हणून काय करावं हे ऐनवेळी सुचत नाही. (These home remedies get rid of urine infection)

लक्षणं (Symptoms of UTI)

वारंवार लघवीला जाणे, 

लघवीमध्ये जळजळ होणे, 

लघवीसोबत रक्त येणे, 

ओटीपोटात किंवा पोटाच्या खालच्या भागात दुखणे अशा समस्या उद्भवू लागतात. मात्र, काही घरगुती उपाय करून तुम्ही युरिन इन्फेक्शनपासून मुक्त होऊ शकता.

उपाय (Home remedies for urinary tract infection)

नारळ पाणी

युरिन इन्फेक्शनच्या समस्येमध्ये नारळ पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नारळाचे पाणी शरीराला आतून हायड्रेट करते. नारळाच्या पाण्यामुळे तुमचे पोटही थंड होते, ज्यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शनमध्ये फायदा होतो.

आवळा

आवळ्याचा प्रभाव थंड मानला जातो. युरिन इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी चार ते पाच वेलच्या एक चमचा आवळा पावडरमध्ये बारीक करून त्याचे सेवन करा.

सफरचंद

सफरचंद केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही, तर त्याचे व्हिनेगर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. एक चमचा कोमट पाण्यात दोन चमचे व्हिनेगर घालून त्यात मध मिसळून सेवन करा. युरिन इन्फेक्शन जाणवल्यास याचा फायदा होतो.

वय कमी पण चेहरा वयस्कर वाटतो? ५ फेशियल योगा प्रकार, आयुष्यभर येणार नाहीत सुरकुत्या

दही

दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म आपल्या शरीराला संसर्गापासून वाचवतात. युरिन इन्फेक्शन झाल्यास दह्याचे सेवन करावे, लघवीतील जळजळीत आराम मिळतो. याशिवाय ताकही पिऊ शकता. तुम्ही  सकाळच्या आहारात दूध दही समाविष्ट करू शकता.

पांढरी वेलची

युरिन इन्फेक्शनमध्ये पांढऱ्या वेलचीचे सेवन फायदेशीर ठरते. पाच ते सहा वेलचीचे दाणे बारीक करून त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर मिसळा. कोमट पाण्यात थोडेसे खडे मीठ आणि डाळिंबाचा रस मिसळून प्या.

Web Title: How to Get Relief From Urine Infection : These home remedies get rid of urin infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.