Remedies For Gas Acidity After Over Eating : अनेकदा असं होतं की, रात्री घरीच आवडीचे पदार्थ, भाज्या बनवल्याने जास्त खाल्लं जातं किंवा पार्टीत रात्री उशिरापर्यंत जास्त खाल्लं जातं. ज्यामुळे अनेकदा सकाळी जड जाणवू लागतं. पोट बरोबर साफही होत नाही आणि सोबतच दिवसभर अॅसिडिटीही शांत बसू देत नाही. रात्री उशिरा खाल्ल्याने आणि जास्त खाल्ल्याने अपचनाची समस्या होऊ लागते. जर आपल्याला सुद्धा अनेकदा असा त्रास होत असेल तर सकाळी काही सोपे उपाय आपल्याला आराम देऊ शकतात. रात्रीच्या जड आणि जास्त जेवणानंतर जर सकाळी काही खास गोष्टींनी दिवसाची सुरूवात केली तर पोट लगेच हलकं वाटू लागेल. तसेच गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाची समस्याही दूर होईल.
जास्त खाल्ल्यानंतर काय कराल?
रात्री जर उशिरा खूप जास्त काही खाल्लं असेल तर ते सकाळपर्यंत पचत नाही. सकाळी पोट फुगलेलं आणि जड वाटू लागतं. यासाठी सकाळी उठून शरीर डिटॉक्स करा. सकाळी झोपेतून उठल्यावर लिंबू पाणी प्या. दिवसभर जड काही न खाता फळं आणि सलाद खा आणि हलक्या हिरव्या भाज्या खाऊ शकता. ग्रीन टी पिऊ शकता आणि दही - ताकही पिऊ शकता.
लिंबू पाणी बेस्ट
रात्री खूप जास्त आणि जड काही खाल्ल्यावर सकाळी १ ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्या. या ड्रिंकने आपलं शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. जर लिंबू पाणी आपल्याला सूट करत नसेल तर एखादी हर्बल टी किंवा ग्रीन टी पिऊ शकता. जर ग्रीन टी प्यायची नसेल तर कोमट पाणी पिणंही पुरेसं आहे.
नाश्त्यात चिया सीड्स आणि फळं
रात्री तेलकट आणि मसालेदार जेवण झाल्यावर पोटाला थोडा वेळ आराम द्यायला हवा. असं केल्यास पोटातील रात्रीचं अन्न पचन व्हायला वेळ मिळतो. अशात जर सकाळी नाश्ता करायचा असेल तर भिजवलेले चिया सीड्स आणि त्यासोबत फळं खाऊ शकता. फळांमध्ये सकाळी सफरचंद बेस्ट ठरेल.
ताकाने पोट होईल शांत
जर हलक्या नाश्त्यानंतर काही पिण्याचं इच्छा असेल तर ताक पिऊ शकता. याने गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाची समस्या दूर होईल. ताकामध्ये पुदिना, काळं मीठ आणि जिरे पूड घाला. याने पोटाला थंडावा मिळेल. पोट हलकं राहणार आणि फ्रेशही वाटेल.
पाणी प्यायला विसरू नका
आदल्या दिवशी जर खूप जास्त काही खाल्लं असेल तर दुसऱ्या दिवशी भरपूर पाणी प्यायला विसरू नका. पाणी प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होते. भरपूर पाण्याने पचनास मदत मिळते आणि सोबतच पोट साफ होण्यासही मदत मिळते. अॅसिडिटीची समस्या पाण्याने लगेच दूर होईल. दिवसभरात किमान ३ लीटर पाणी प्यावं.
फळं आणि सलाद
रात्री खूप जास्त खाल्ल्यानंतर होणार त्रास टाळण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे पोटाला आराम द्या. म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी खूप जास्त जड असं काही खाऊ नका. पोटाला आराम मिळवण्यासाठी फळं किंवा भाज्या जास्त खा. सलाद जास्त खा, यातून शरीराला फायबर मिळेल ज्यामुळे पोट लगेच साफ होईल. फळं आणि सलाद खाल्ल्याने पोट हलकं होतं.
Web Summary : Feeling heavy after overeating? Start your day with lemon water, fruits, and chia seeds. Drink buttermilk and plenty of water to detox your body, ease digestion, and relieve acidity. Avoid heavy meals for a light, fresh feeling.
Web Summary : ज्यादा खाने के बाद भारीपन महसूस हो रहा है? नींबू पानी, फल और चिया सीड्स से दिन की शुरुआत करें। छाछ और खूब पानी पिएं, जिससे शरीर डिटॉक्स होगा, पाचन आसान होगा और एसिडिटी से राहत मिलेगी। हल्का महसूस करने के लिए भारी भोजन से बचें।