Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ना वजन उचलायचंय, ना धावायचंय...'ही' ३० सेकंदाची सोपी टेस्ट सांगेल शरीर किती मजबूत, किती कमजोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 14:32 IST

Healthy Aging Test : वयानुसार आपलं शरीर किती फिट आहे हे माहीत करून घेण्याची अनेकांची इच्छा असते. अशात वैज्ञानिकांनी यासाठी एक सोपा उपाय सांगितलाय.

Healthy Aging Test : वय वाढतं जाणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. जसजसं वय वाढत जातं शरीरातही वेगवेगळे बदल होत जातात. काही अवयव कमजोर होऊ लागतात. अनेकांना वाटत असतं की, आपण वयाच्या मोठ्या टप्प्यातही फिट आणि हेल्दी रहावं. वयानुसार आपलं शरीर किती फिट आहे हे माहीत करून घेण्याची अनेकांची इच्छा असते. अशात वैज्ञानिकांनी यासाठी एक सोपा उपाय सांगितलाय. जो घरबसल्या करून आपण ३० सेकंदात शरीराची ताकद आणि वाढत्या वयाच्या प्रभावाचा अंदाज लावू शकता.

जर्नल ऑफ स्पोर्ट अॅन्ड हेल्थ सायन्समध्ये प्रकाशित एका अभ्यासात सांगण्यात आलंय की, ३० सेकंदाची सिट-टू-स्टँड टेस्ट (Sit To Stand Test) सांगू शकते की, कोणत्या व्यक्तीला पडण्याचा, दवाखान्यात भरती होण्याचा किंवा वेळेआधी मृत्यूचा धोका किती आहे. ही एक सोपी टेस्ट आहे जी स्नायूंची ताकद आणि शरीराची कार्यक्षमता समजून घेण्यास मदत करते.

कालांतराने स्नायू कमजोर का होतात?

वय वाढल्याचा सगळ्यात जास्त प्रभाव हा स्नायू आणि हाडांवर बघायला मिळतो. ही प्रक्रिया तिशीनंतर हळूहळू सुरू होते आणि ६० वयानंतर अधिक वेगाने वाढू लागते. एक्सपर्ट सांगतात की, शरीराची फास्ट ट्वीच मसल फायबर स्नायूंना कमजोर करू लागतं. सोबतच तंत्रिका तंत्रही आधीसारखं स्नायूंना अॅक्टिव करू शकत नाही. त्याशिवाय स्नायूंमध्ये फॅट आणि इतर टिश्यू जमा होऊ लागतात. ज्यामुळे शरीराची ताकद आणि हालचालीवर प्रभाव पडतो.

काय आहे सिट-टू-स्टँड टेस्ट?

सिट-टू-स्टँड टेस्ट फारच सोपी आहे आणि ही घरीच काही सेकंदात करू शकता. ही टेस्ट करण्यासाठी आपल्याला केवळ एका खुर्चीची गरज भासेल. टेस्ट करण्यासाठी व्यक्तीला खुर्चीवर बसावं लागतं आणि नंतर ३० सेकंदाच्या आत जेवढं शक्य असेल तेवढ्या वेळेस बसायचं आणि उठायचं आहे. यादरम्यान हात छातीवर क्रॉस करून ठेवायचे आहेत. यानंतर वय, वजन, उंची आणि एकूण रिपीटेशनच्या आधारावर ताकदीचं आकलन केलं जातं.

रिसर्चमधून काय समोर आलं?

या रिसर्चमध्ये ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या १८७६ लोकांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यात संशोधकांना आढळलं की, ज्या लोकांची सिट-टू-बॅक पॉवर कमी होती, त्यांच्यात आरोग्यासंबंधी धोका जास्त बघण्यात आला. पुरूषांमध्ये कमी मसल पॉवर असलेल्या लोकांमध्ये पडण्याचा आणि फ्रॅक्चरचा धोका जास्त आढळला. तेच महिलांमध्ये हिप फ्रॅक्चर आणि पडण्याचा धोका जास्त आढळून आला. ज्या महिलांची स्नायूंची ताकद कमी होती, त्यांच्यात दवाखान्यात भरती होण्याचा धोका २९ टक्के जास्त होता. 

तसेच कमी मसल पॉवर असलेल्या पुरूषांमध्ये मृत्यूचा धोका ५७ टक्के जास्त होता. तेच महिलांमध्ये हा धोका दुपटीपेक्षा जास्त होता. डॉक्टर सांगतात की, ही टेस्ट वाढत्या वयात शरीराची नेमकी स्थिती समजून घेण्यास मदत करते. यातून हे जाणून घेता येतं की, व्यक्तीचे स्नायू किती मजबूत आहेत आणि भविष्यात त्यांना आरोग्यासंबंधी कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : 30-Second Sit-to-Stand Test Reveals Body Strength, Health Risks

Web Summary : A 30-second sit-to-stand test can assess muscle strength and predict health risks like falls, hospitalization, and mortality, especially in older adults. Research shows lower power indicates increased health risks. This simple test helps understand body condition with aging.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स