Join us

जेवण झाल्यावर किंवा सतत काहीतरी गोड खावंसं वाटतं? करा फक्त १ गोष्ट, शुगर क्रेव्हिंग होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 15:05 IST

How To Control Sweet Cravings : घरात काहीच गोड नसेल तर चक्क साखर किंवा गूळ खाऊन ही इच्छा पूर्ण केली जाते.

नाश्ता झाला किंवा जेवण झालं की टाक तोंडात काहीतरी गोड, काम करतानाही हेच. गोड पदार्थ हा अनेकांसाठी वीक पॉईंट असतो. एरवी गोडावर ताव मारणारे बरेच जण असतात. पण अनेकांना काम करत असताना किंवा नाश्ता आणि जेवण झाल्यावर गोड खाण्याची इच्छा होते.  गोड आवडणं ठिक आहे पण सतत गोड खायची इच्छा होत असेल तर मात्र त्यामागे काही नेमकी कारणं असू शकतात. वेळीच या कारणांचा शोध घ्यायला हवा. कारण सतत गोड खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस, दाताचे विकार यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात (How To Control Sweet Cravings). 

एकदा गोड खायची इच्छा झाली की अनेकांना काहीच सुधरत नाही. असे लोक जेवण झाल्यावर किंवा अगदी झोपतानाही आवर्जून गोड खातात. घरात काहीच गोड नसेल तर चक्क साखर किंवा गूळ खाऊन ही इच्छा पूर्ण केली जाते. बरेच जण गोड खावसं वाटलं तर चहा-कॉफी घेणे पसंत करतात. अशा लोकांचा दिवसातून कितीवेळा चहा होतो याला काही गणतीच नसते. चहा किंवा कॉफी घेतल्यावर थोडा वेळाकरता तरतरी आल्यासारखे वाटते पण काही वेळातच याचा इफेक्ट कमी होतो आणि आपल्याला पुन्हा थकल्यासारखे वाटायला लागते . 

अचानक गोड खाण्याची इच्छा का होते? 

(Image : Google)

शरीरात रक्तातील साखरेची पातळी असंतुलित आहे आणि आपल्याला अधिक उर्जेची गरज आहे असे यातून दिसून येते. मूड स्वींग व प्रेगन्सी ब्लूज या मानसिक अवस्थांमध्ये देखील अशाप्रकारे अचानक गोड खावेसे वाटते. जेव्हा आपल्याला खूप भूक लागते किंवा मानसिक, भावनिक ताण असतो अशीवेळीही गोड खावेसे वाटते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील स्टेरोटोनीनची पातळी खालावते. गोड खाल्ले की रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढते मग आपले स्वादूपिंड मोठ्या प्रमाणावर इन्शुलीन निर्माण करु लागते. 

मात्र हे तब्येतीसाठी अजिबात चांगले नसते. काही जण घाईगडबडीत सकाळची नाश्ता स्कीप करतात. एका संशोधनानुसार सकाळचा नाश्ता न करणाऱ्यांमध्ये गोड खाण्याची इच्छा जास्त प्रमाणात होते.जर तुम्हाला सतत गोड खावे असे वाटत असेल तर हे तुमच्या आहारात क्रोमीयमची पातळी कमी असण्याचे एक लक्षण असू शकते. क्रोमीयममुळे इन्शुलीनची संवेदनशीलता सुधारते व मेंदूच्या स्टेरोटोनीन, नोरेपीनफ्रीनच्या पातळीमध्ये सुधारणा होते.

उपाय काय? 

(Image : Google)

शुगर क्रेव्हींग्ज कमी करण्यासाठी जीभ स्वच्छ ठेवण्याची मदत होते. जीभ साफ करणे फक्त तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त नसते तर त्यामुळे आणखीही बरेच फायदे होऊ शकतात. आपण जे काही खातो त्याचा स्वाद बराच वेळ आपल्या जीभेवर तसाच राहतो. पण खाल्ल्यानंतर जीभ व्यवस्थित साफ केली तर तोंडात असणारे हे फ्लेवर्स निघून जाण्यास मदत होते आणि सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. जीभेवर अन्नाचे काही कण राहीले तर आपल्याला सतत काही ना काही खाण्याची इच्छा होत राहते, पण ते वेळीच साफ केले तर अशी इच्छा होत नाही आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठीही याची चांगली मदत होते. यासाठी तांब्याच्या टंग क्लिनरचा उपयोग करणे फायदेशीर ठरते. यामुळे जीभेवरील व्हायरस, बॅक्टेरीया निघून जाण्यास मदत होते.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना