Join us

How To Control Diabetes Naturally : शुगर लेव्हल नेहमी राहील कंट्रोलमध्ये; रोज सकाळी करा १ उपाय, शुगर वाढण्याचं टेंशन कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:23 IST

How To Control Diabetes Naturally : जांभळाच्या बियांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे मधुमेहाच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते.

अशी अनेक फळे उन्हाळी हंगामात येतात ज्यांना चव आणि आरोग्याचे पॉवरहाऊस म्हटले जाते. त्यातीलच एक जांभूळ आहे. रसाळ गोड जांभळं उष्णतेपासून आराम मिळण्यास उत्तम मानले जातात. पण केवळ जांभळंच नाही तर त्याच्या बिया आरोग्यासाठीही फायदेशीर मानल्या जातात, विशेषतः मधुमेहींसाठी. (How to Control Sugar Level) जांभळाच्या बियांमध्ये आढळणाऱ्या गुणधर्मांबद्दल सांगायचे तर, त्यात अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी, झिंक आणि कॅल्शियमचे गुणधर्म आढळतात. जांभळाच्या बियांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे मधुमेहाच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. (Diabetes jamun seeds powder can easily reduce blood sugar level in diabetes patients)

डायबिटीस

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जांभूळ ओळखले जाते. जांभळाच्या बियांमध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन नावाची संयुगे असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

ब्लड प्रेशर सतत वाढतं? ५ बदल करा, बीपी नेहमी कंट्रोलमध्ये राहील, म्हातारे होईपर्यंत ठणठणीत राहाल

शुगर लेव्हल

या बियांमध्ये हायपोग्लाइसेमिक गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी होण्यास मदत होते. परंतु मर्यादित प्रमाणात सेवन करणे चांगले नाहीतर नुकसान देखील होऊ शकते.

शरीरसंबंधांपूर्वी गोळी घेतली, गर्भधारणेचं टेंशन नाही; शास्त्रज्ञांचा नव्या गर्भनिरोधक औषधाचा दावा

भारतीय ब्लॅकबेरी म्हणजेच जांभूळ हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते. यात तुरट आणि लघवीरोधक यांसारखे गुणधर्म असतात, ज्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

असा करा वापर

जांभळाच्या बीया स्वच्छ पाण्यात धुवून उन्हात वाळवाव्यात. यानंतर त्याचा वरचा भाग काढून हिरवा भाग ठेवा. सुक्या बिया मिक्सरमध्ये टाकून बारीक करा आणि हवाबंद डब्यात ठेवा.  रोज सकाळी एक वाटी पाण्यात २ चिमूट जांभूळ पावडर एकत्र करून या पाण्याचे  सेवन करा. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तुम्ही जर डायबिटीससाठी गोळ्या घेत असाल तर त्या गोळ्या नियमित सुरू ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्यानं या पावडरचे सेवन करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमधुमेह