हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या कित्येक तक्रारी वाढल्या आहेत. कमी वयातच अनेक आजार मागे लागत आहेत. त्यापैकीच एक आहे कोलेस्टेरॉल. हा त्रास सध्या खूप वाढला असून आपल्या आजुबाजुला असे कित्येक तरुण आपण पाहातो की ज्यांचं कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे. कोलेस्टेरॉल वाढणं म्हणजे थेट हृदयाच्या आरोग्यालाच धोका. म्हणूनच ते नेहमीच कंट्रोलमध्ये असणं खूप गरजेचं आहे (simple changes in daily diet to control cholesterol). आता इतर काही उपाय करूनही तुमचं कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये येत नसेल तर पुढे सांगितलेल्या काही साध्या सोप्या गोष्टी करून पाहा..(home remedies to control cholesterol)
कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यासाठी आहारात काय बदल करावे?
रोजच्या जेवणात केलेले काही साधे सोपे बदल कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात, याविषयी आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही माहिती...
१. जर तुमची पचनक्रिया, चयापचय क्रिया चांगली असेल तर कोलेस्टेरॉलही नियंत्रित राहू शकतं. त्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असू द्या. कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल.
२. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ खा. कारण असं केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते. त्यामुळे चयापचय क्रियेत अडथळा येत नाही आणि मग कोलेस्टेरॉलही वाढत नाही.
३. ग्रीन टी मध्ये असणारे काही ॲण्टीऑक्सिडंट्स बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसातून एकदा ग्रीन टी घेण्यास हरकत नाही.
४. जेवणाच्या आधी जर फळं, सलाड, वाटीभर दही, मोड आलेली कडधान्ये असे काही पौष्टिक पदार्थ घेतले तर आपोआप भूक कमी होते आणि ओव्हरइटिंग टाळलं जातं. त्यामुळेही कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
५. सॅच्युरेटेड फॅट्स असणारे प्रोसेस्ड फूड, रिफाईंड कार्ब्स खाणे बंद करायला हवे.
उन्हाळ्यात दही भात खाण्याच्या पारंपरिक पद्धतीचे वाचा फायदे, पाहा ५ मिनिटांची फक्कड दहीभात रेसिपी
६. आलं आणि लसूण हे दोन्ही पदार्थ कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे त्यांचा आहारातला वापर वाढवा.
७. अव्हाकॅडो, अक्रोड, जवस असे ओमेगा ३ देणारे पदार्थ जास्त प्रमाणात खा. त्यामुळेही कोलेस्टेरॉल कमी हाेण्यास मदत होते.
