Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शुगर- कोलेस्टेरॉल नेहमीच वाढलेलं असतं? जेवणाच्या आधी 'हे' पदार्थ खा- रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 15:31 IST

How to Control Blood Sugar Level and Cholesterol?: शुगर आणि कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात..(food that helps to control sugar and cholesterol)

ठळक मुद्दे शुगर आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात?

बदललेल्या जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा वाईट परिणाम सध्या आपण सगळेच जण अनुभवत आहोत. त्यामुळेच तर कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत असून त्यांना तोंड द्यावे लागत आहे. बीपी, शुगर, हृदयविकार हे त्रास तर आहेतच, पण वाढतं वजनही कसं कमी करावं हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडची वाढलेली पातळी हा देखील अनेकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे (How to Control Blood Sugar Level and Cholesterol?). म्हणूनच तुम्हीही वाढलेली शुगर आणि कोलेस्टेरॉल कसं कमी करावं असा विचार करत असाल तर पुढे सांगितलेले काही उपाय निश्चितच उपयोगी ठरू शकतात.(food that helps to control sugar and cholesterol)

शुगर- कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपाय

 

शुगर आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात, याची माहिती डॉक्टरांनी madhavbaug_airoli या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी जे उपाय सांगितले आहेत, ते अगदी सहज प्रत्येकालाच करता येणं शक्य आहे.

१. डॉक्टरांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे जेवणाच्या आधी दोन पिकलेले टोमॅटो खाणे. टोमॅटोमधले काही घटक रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल या दोन्ही गोष्टी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. 

पार्लरमध्ये जायला वेळच नाही? थेंबभर खोबरेल तेल 'या' पद्धतीने लावा, चेहरा नेहमीच चमचमत राहील

२. दुसरा उपाय म्हणजे तुमच्या घरात ज्या काेणत्या भाज्या आहेत त्या सगळ्या थोड्या थोड्या प्रमाणात घ्या आणि त्या मिक्सरमध्ये फिरवून त्याचा ज्यूस करा. हा भाज्यांचा ताजा ज्यूस जेवणाच्या आधी १०० मिली एवढा घ्यावा. यामुळे कोलेस्टेरॉल आणि शुगर नियंत्रित राहण्यास तर मदत होतेच, पण वजनही कंट्रोलमध्ये राहाते. पण सगळ्याच भाज्या कच्च्या स्वरुपात खाणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय करावा.

 

३. आवळा देखील शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो, असं डॉक्टर सांगतात. त्यामुळे रोज सकाळी १ ताजा आवळा खावा किंवा आवळ्याचा ज्यूस प्यावा.

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

४. वजन, शुगर आणि कोलेस्टेरॉल हे सगळेच नियंत्रित ठेवायचे असेल तर तुमच्या आहारातून बेकरीचे पदार्थ आणि डेअरीचे पदार्थ पुर्णपणे टाळायला हवेत, असा सल्ला डॉक्टर देतात.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Control sugar, cholesterol: Eat these foods before meals for better health.

Web Summary : To manage sugar and cholesterol, doctors recommend eating two tomatoes or a mixed vegetable juice before meals. Amla consumption and avoiding bakery/dairy products are also advised. Consult your doctor before making dietary changes.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नटोमॅटोभाज्यामधुमेह