Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी खा ५ पदार्थ , रणरणत्या उन्हाचा त्रास होणार नाही-तगमग होईल कमी...

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी खा ५ पदार्थ , रणरणत्या उन्हाचा त्रास होणार नाही-तगमग होईल कमी...

How to avoid heat stroke in summer Essential items for hot weather : 5 Best food items to carry during extreme heat : Tips for preventing dehydration in hot weather : स्वयंपाकघरामधील काही असे पदार्थ आहेत जे सोबत असतील तर उन्हाचा त्रास होणार नाही....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 17:11 IST2025-04-29T16:50:23+5:302025-04-29T17:11:52+5:30

How to avoid heat stroke in summer Essential items for hot weather : 5 Best food items to carry during extreme heat : Tips for preventing dehydration in hot weather : स्वयंपाकघरामधील काही असे पदार्थ आहेत जे सोबत असतील तर उन्हाचा त्रास होणार नाही....

How to avoid heat stroke in summer Essential items for hot weather Best food items to carry during extreme heat | उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी खा ५ पदार्थ , रणरणत्या उन्हाचा त्रास होणार नाही-तगमग होईल कमी...

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी खा ५ पदार्थ , रणरणत्या उन्हाचा त्रास होणार नाही-तगमग होईल कमी...

उन्हाळा हा एक असा ऋतू आहे की जो कोणालाच आवडत नाही. उन्हाळ्यात उकाड्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे जीवाची काहिली होते. सतत अंगाला येणारा घाम आणि त्याची दुर्गंधी नकोशी वाटते. या सगळ्या कारणांमुळे खरंतर, उन्हाळ्यात घराबाहेर पडणेच नकोसे वाटते. या दिवसांत रणरणत्या उन्हांत घराबाहेर पडणे (How to avoid heat stroke in summer Essential items for hot weather) म्हणजे अक्षरशः जीवावर येते. परंतु आपल्यापैकी बऱ्याचजणांना कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडावेच लागते. परंतु अशा कडाक्याच्या उन्हांत बराचकाळ राहिल्याने त्याचे (5 Best food items to carry during extreme heat) आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. याचबरोबर, वारंवार उन्हांत फिरण्याने काहींना डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणेअशा अनेक समस्या सतावतात(Tips for preventing dehydration in hot weather).

यासाठीच, कडाक्याच्या उन्हांत जर घराबाहेर पडायचे असेल तर आपण आपली स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपण पाण्याची बाटली, टोपी, स्कार्फ अशा काही मोजक्या गोष्टी कायम सोबत घेतोच. यासोबतच, जर आपण आपल्या स्वयंपाकघरामधील काही असे पदार्थ आहेत जे सोबत घेतले तर आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही. तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासापासून आपला बचाव केला जाईल. हे पदार्थ कोणते ते पाहूयात... 

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सोबत ठेवा हे ५ पदार्थ... 

१. कांदा :- उन्हाळ्यात घराबाहेर पडताना खिशात एक कांदा ठेवावा. हा एक पारंपरिक आणि पूर्वापार चालत आलेला घरगुती उपाय आहे. खिशात कांदा ठेवल्याने आपल्या शरीराचे तापमान उन्हाळ्यात देखील संतुलित ठेवण्यास अधिक मदत होते. याचबरोबर, उन्हाळ्यात चक्कर येणे, उलट्या होणे किंवा थकवा वाटणे यासारख्या शारीरिक समस्यांपासून देखील बचाव करण्यास कांदा फायदेशीर ठरतो. 

२. आमचूर पावडर :- कांद्याप्रमाणेच उन्हाळ्यात आमचूर पावडर देखील आपले उन्हापासून संरक्षण करते. यासाठी घराबाहेर पडताना पाण्यासोबतच आमचूर पावडर देखील घ्यावी. जर आपल्याला उन्हामुळे थकवा किंवा कमकुवत वाटू लागले तर, आमचूर पावडर थेट पाण्याच्या बाटलीत घालून ते पाणी प्यावे. यामुळे थकवा किंवा मरगळ मिनिटभरात कमी होऊन आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. 

३. चिंचगोळी किंवा चिंच :- उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी चिंच किंवा चिंचगोळी सोबत ठेवावी. ताजी चिंच पाण्यांत भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. घराबाहेर पडण्यापूर्वी आपण अशाप्रकारे चिंचेचे पाणी तयार करुन सोबत घेऊ शकता किंवा हे पाणी पिऊन मगच घराबाहेर पडू शकता. चिंच शरीराला आतून थंडावा देत हायड्रेटेड ठेवते. 

४. ताक :- उन्हाळ्यात आपण सगळेचजण ताक पितो. जर उन्हाळ्यात तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी एक ग्लासभर ताक पिऊन निघालात तर आपल्याला उन्हाचा फारसा त्रास होणार नाही. तसेच प्रखर सूर्यप्रकाशापासून तुमचे रक्षण केले जाईल. 

५. लिंबूपाणी :- उन्हाळ्यात लिंबूपाणी म्हणजे वरदानच. आपण पाण्यासोबतच लिंबूपाणी देखील पिऊ शकता. लिंबूपाणी तुम्हाला आतून हायड्रेटेड ठेवण्यास अतिशय फायदेशीर ठरते.

Web Title: How to avoid heat stroke in summer Essential items for hot weather Best food items to carry during extreme heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.