सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये अपचन, अॅसिडिटी, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ यांसारख्या समस्या अनेक महिलांना सतत त्रास देतात. बहुतेक वेळा यामागे चुकीचा आहार, ताणतणाव किंवा झोपेची कमतरता कारणीभूत मानली जाते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, काहीवेळा आपल्या रोजच्या वापरातील कपडेही आरोग्यावर परिणाम करू शकतात? विशेषतः चुकीच्या साईजची किंवा खूप घट्ट ब्रा घालण्यामुळे पोटावर आणि छातीवर अनावश्यक दबाव येऊन अपचनासारख्या समस्या वाढू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. हे ऐकायला थोडे अजब वाटेल परंतु ब्रेसियर आणि पचनक्रिया यांच्यातही काही संबंध असू शकतो, हे बहुतेक महिलांना माहीत नसते(how tight bra affects digestion).
अनेक महिलांना याची कल्पनाही नसते की, चुकीची ब्रा फिटिंग श्वासोच्छ्वास, पचनक्रिया आणि बॉडी पोश्चरवर परिणाम करू शकते. त्यामुळे वारंवार अॅसिडिटी, अस्वस्थता किंवा जेवणानंतर जडपणा जाणवत असेल, तर त्यामागे ब्रेसियर हे देखील एक कारण असू शकते. आपल्या ब्रेसियरच्या फिटिंगचा थेट परिणाम आपल्या शरीरातील अन्नाच्या (bra pressure and digestive discomfort) पचन प्रक्रियेवर होत असतो. अयोग्य फिटिंगची ब्रा केवळ अस्वस्थता निर्माण करत नाही, तर ती पचनाशी संबंधित गंभीर समस्यांनाही निमंत्रण देऊ शकते. ब्रेसियरमुळे पचनक्रिया नेमकी कशी विस्कळीत होते या विषयावर डॉ. सोनू खोखर (MBBS, हेल्थ अँड वेलनेस एक्सपर्ट) यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत (wrong fitting bra side effects) नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूयात...
चुकीची ब्रेसियर साईझ करते पचनक्रियेवर परिणाम...
तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या ब्रेसियरचा आकार किंवा साईझ योग्य नसेल किंवा तुम्ही चुकीच्या फिटिंगची ब्रा घालत असाल, तर त्याचा परिणाम केवळ तुमच्या ब्रेस्टचा आकार आणि शरीराच्या ठेवणीवरच होत नाही, तर तुमच्या पचनक्रियेवरही वाईट परिणाम होतो.
जर तुम्हाला वारंवार पचनाच्या समस्या जाणवत असतील, अपचन, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर त्याचे एक कारण तुमची ब्रेसियर असू शकते. खरंतर, चुकीच्या आकाराची किंवा फिटिंगची ब्रेसियर घातल्यामुळे खांदे, छाती आणि पोटाच्या वरच्या भागावर दाब पडतो, ज्यामुळे अन्न पचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज खा १ वाटी 'हा' पदार्थ, स्मार्ट डाएट, हेल्दी हार्ट...
आपल्या ब्रेसियरचा बँड हा पोट आणि डिओडेनम (Duodenum - लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) वरून जातो. आपण जे काही खातो, त्या अन्नपदार्थांना बारीक करून पचवण्याचे काम डिओडेनम करत असते. अशा परिस्थितीत, ब्रेसियरच्या घट्ट बँडमुळे जर या भागावर दबाव पडला, तर पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात.
याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही अगदी सैल ब्रेसियर घातली पाहिजे, कारण यामुळे ब्रेस्टला योग्य सपोर्ट मिळत नाही. तुम्ही तुमच्या ब्रेस्ट आणि कप साइजच्या मापानुसारच योग्य ब्रेसियर निवडावी.
किती दिवस उशीरा आली मासिक पाळी येण्यात तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...
खूप जास्त घट्ट ब्रेसियर घातल्यामुळे ब्रेस्ट टिश्यूजचे नुकसान होऊ शकते आणि छातीत वेदना किंवा जळजळ देखील होऊ शकते. खरंतर, जेव्हा ब्रेस्ट झोनवर जास्त दबाव पडतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या अन्ननलिकेवरही होतो आणि त्यामुळे पचनक्रिया बिघडू लागते.
हेल्थ अँड वेलनेस एक्सपर्ट, MBBS डॉक्टर सोनू खोखर सांगतात की, ब्रेसियरचा परफेक्ट आकार आणि साईज केवळ ब्रेस्टला सपोर्ट आणि योग्य आकार देण्यासाठीच महत्त्वाचा नसतो, तर याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावरही होतो. जर तुमच्या ब्रेसियरचा आकार परफेक्ट नसेल, तर यामुळे तुम्हाला अपचन आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या वारंवार त्रास देऊ शकतात.
