Join us
Daily Top 2 Weekly Top 5

१ कप चहा-२ बिस्किटं; डॉक्टर सांगतात सकाळची ही सवय तुमच्या तब्येतीचं भजं करतेय कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:15 IST

Health Risks of Chai and Biscuits : चहा - बिस्किट खाण्याची ही छोटीशी सवय सायलेंट किलर ठरू शकते. आता आपल्याला प्रश्न पडणं साहजिक आहे की, असं कसं होऊ शकतं? तर तेच आपण समजून घेऊया. 

Health Risks of Chai and Biscuits : झोपेतून उठल्या उठल्या चहा बिस्किट खाण्याची सवय केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्या सुद्धा असते. भरपूर लोकांना तर ही सवय अशी असते की, त्याना चहा -बिस्किट खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. भरपूर लोक सकाळी उपाशीपोटी चहा पिणं टाळतात, त्यामुळे ते चहासोबत बिस्किट खातात. एक कप गरमागरम चहासोबतच चार ते पाच बिस्किट तर लोक खातातच खातात. पण ही सवय तब्येतीसाठी फारच घातक ठरू शकते. हेल्थ एक्सर्टनुसार, चहा - बिस्किट खाण्याची ही छोटीशी सवय सायलेंट किलर ठरू शकते. आता आपल्याला प्रश्न पडणं साहजिक आहे की, असं कसं होऊ शकतं? तर तेच आपण समजून घेऊया. 

मुंबईतील प्रसिद्ध ऑर्थोपॅडिक सर्जन आणि हेल्थ एज्युकेटर डॉ. मनन व्होरा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते सांगतात की, चहा आणि बिस्किटाचं कॉम्बिनेशन गट हेल्थसाठी नुकसानकारक ठरतं. चहामध्ये कॅफीन आणि टॅनिनसारखे तत्व असतात. जे उपाशीपोटी घेतले तर ते पोटाच्या नाजूक थरासाठी घातक ठरू शकतात. सकाळी जेव्हा आपण सगळ्यातआधी चहा पितो, तेव्हा पोटात अॅसिडचं निर्माण अधिक वाढतं. याने पोटाच्या आतील थरात जळजळ होते, सोबतच अॅसिडिटी, मळमळ आणि पोट फुगणे अशा समस्याही होतात. तसेच पचनासंबंधी समस्याही होतात.

भरपूर लोकांना हेच वाटतं की, चहासोबत बिस्किट खाणं हा एक हलका नाश्ता आहे. पण मुळात बिस्किट एम्प्टी कॅलरीजचा स्त्रोत असतात. बाजारात मिळणारे जास्तीत जास्त बिस्किटे ही मैदा, जास्त साखर आणि अनहेल्दी फॅट्सपासून बनवले जातात. उपाशीपोटी बिस्किट खाल्ल्याने शरीरात ब्लड शुगरचं प्रमाणही वाढतं आणि तेवढ्याच वेगाने कमी होतं. या चढ-उतारामुळे व्यक्तीला दिवसभर थकवा जाणवतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा गोड खाण्याची तीव्र इच्छा होते.

चहा आणि बिस्किटाचं हे कॉम्बिनेशन तब्येतीसाठी फारच घातक ठरतं. चहाचा अॅसिडिक स्वभाव आणि बिस्किटातील मैदा पचन तंत्रावर दबाव निर्माण करतो. पोट जड वाटू लागतं. ही सवय जर जास्त काळ राहिली तर आतड्यांची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते. ज्यामुळे पोषक तत्वांच्या अॅब्जॉर्बशनमध्ये अडथळा येतो आणि मेटाबॉलिज्म स्लो होतं. 

डॉक्टर सांगतात की, समस्या चहामध्ये नाही तर कॉम्बिनेशनमध्ये आहे. चहा कधीही उपाशीपोटी पिऊ नये. चहा नेहमीच नाश्ता केल्यानंतरच प्यावा. त्याशिवाय चहासोबतच मैद्याचे बिस्किट खाण्याऐवजी प्रोटीन किंवा फायबर असलेले पर्याय निवडावेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tea and biscuits to start the day? A harmful habit!

Web Summary : Starting the day with tea and biscuits can harm your gut health. Tea increases acidity, while biscuits cause blood sugar spikes. This combination leads to digestive issues, fatigue, and potential long-term metabolic problems. Doctors advise against consuming tea on an empty stomach.
टॅग्स : हेल्थ टिप्सअन्नआरोग्य