Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फक्त ४-५ तास झोपूनही काही लोक दिवसभर फ्रेश-एनर्जेटिक कसे राहतात, पाहा त्यांचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:22 IST

Secret of Energy After Short Sleep : प्रश्न असा पडतो की, काही लोकांमध्ये कमी झोप घेऊनही एनर्जी कशी राहते? त्यांच्याकडे काही सुपरपॉवर असते का किंवा यामागे काही वैज्ञानिक कारण असतं? समजून घेऊया.

Secret of Energy After Short Sleep : सामान्यपणे सगळेच डॉक्टर तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी, फिट राहण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी रोज रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात. जर इतकी झोप घेतली नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे घातक ठरू शकतं. अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. पण आपण अशाही काही लोकांना पाहिलं असेल जे केवळ ४ ते ५ तासांची झोप घेऊनही दिवसभर अ‍ॅक्टिव, फ्रेश आणि एनर्जेटिक राहतात. त्यांना झोपही येत नाही आणि थकवाही जाणवत नाही. तर काही लोक असेही असतात जे ८ तासांची झोप घेऊन सुस्त असतात. पण मग प्रश्न असा पडतो की, काही लोकांमध्ये कमी झोप घेऊनही एनर्जी कशी राहते? त्यांच्याकडे काही सुपरपॉवर असते का किंवा यामागे काही वैज्ञानिक कारण असतं? समजून घेऊया.

कमी झोपेनंतरही फ्रेश राहण्याचं गुपित

शॉर्ट स्लीपर जीन

वैज्ञानिकांनुसार काही लोकांमध्ये शॉर्ट स्लीपर जीन असतात. असे लोक जैविक रूपाने कमी झोपेतही पूर्ण रिकव्हरी करतात. त्यांचा मेंदू आणि शरीर कमी झोपेतही स्वत:ला रिचार्ज करतात. पण ही क्षमता सगळ्यांमध्ये नसते. ही काही लोकांमध्ये जन्मताच येते.

मजबूत बॉडी क्लॉक

आपल्या शरीरात एक बायोलॉजिकल क्लॉक असते, तिला बॉडी क्लॉक असंही म्हणतात. ज्या लोकांची बॉडी क्लॉक मजबूत आणि संतुलित असते, ते कमी झोपेनंतरही चांगलं काम करू शकतात. त्यांचं शरीर योग्यवेळी हार्मोन रिलीज करतं, ज्यामुळे सकाळी ते फ्रेश आणि एनर्जेटिक राहतात.

चांगल्या क्वालिटीची झोप

असं काही गरजेचं नाही की, जे लोक कमी झोप घेतात, त्यांच्या झोपेची क्वालिटी खराब असते. बरेच लोक कमी झोपतात पण त्यांची झोप गाढ आणि अडथळ्यांशिवाय असते. अशात मेंदू आणि शरीरावर चांगला प्रभाव पडतो.

लाइफस्टाईल आणि सवयी

कमी झोपेनंतरही फ्रेश आणि अ‍ॅक्टिव राहणारे लोक नेहमी झोपेतून वेळेवर उठतात, उन्हात बसतात, एक्सरसाईज - वॉक करतात, जंक फूड खात नाहीत, स्क्रीन जास्त बघत नाहीत. या सवयी त्यांनी नॅचरली अ‍ॅक्टिव राहण्यास मदत करतात.

कमी झोप सगळ्यांसाठी सुरक्षित?

आधी तर हे समजून घेतलं पाहिजे की, कमी झोपेनंतरही जास्त एनर्जी प्रत्येकासाठी नॉर्मल नाही. जर एखाद्या व्यक्तीला कमी झोप घेऊनही चांगलं जाणवत असेल, तर हे त्याच्या शरीराच्या हिशेबाने असू शकतं. पण जास्तीत जास्त लोकांमध्ये कमी झोप घेतल्यानं थकवा, चिडचिड, हार्मोन असंतुलन आणि इम्यूनिटी कमी होण्याचं कारण ठरते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Short Sleep, High Energy: The Secrets Behind It Revealed

Web Summary : Some people stay energetic with little sleep due to genetics, strong body clocks, good sleep quality, and healthy lifestyles. However, consistently short sleep can cause fatigue and health issues for most people; individual needs vary.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स