Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज वापरता तो टॉवेल रोज धुता की..? टॉवेल किती वेळा धुवावा, आरोग्यावर काय होतो परिणाम

रोज वापरता तो टॉवेल रोज धुता की..? टॉवेल किती वेळा धुवावा, आरोग्यावर काय होतो परिणाम

काही लोक रोज आपण वापरलेला टॉवेल धुतात. तर बरेच जण आठवड्यातून एकदा आपल टॉवेल धुतात. त्यामुळे टॉवेल नेमका किती दिवसांनी धुवावा याबाबत जाणून घेऊया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:28 IST2025-01-15T16:28:05+5:302025-01-15T16:28:54+5:30

काही लोक रोज आपण वापरलेला टॉवेल धुतात. तर बरेच जण आठवड्यातून एकदा आपल टॉवेल धुतात. त्यामुळे टॉवेल नेमका किती दिवसांनी धुवावा याबाबत जाणून घेऊया...

How often should you wash your towel, and how does it affect your health? | रोज वापरता तो टॉवेल रोज धुता की..? टॉवेल किती वेळा धुवावा, आरोग्यावर काय होतो परिणाम

रोज वापरता तो टॉवेल रोज धुता की..? टॉवेल किती वेळा धुवावा, आरोग्यावर काय होतो परिणाम

आंघोळीनंतर आपण ज्या टॉवेलने अंग पुसतो तो आधी अनेक वेळा वापरला गेलेला असतो. याच दरम्यान त्यात अनेक बॅक्टेरिया देखील जमा होत राहतात. काही लोक रोज आपण वापरलेला टॉवेल धुतात. तर बरेच जण आठवड्यातून एकदा आपला टॉवेल धुतात. त्यामुळे टॉवेल नेमका किती दिवसांनी धुवावा याबाबत जाणून घेऊया...

सीएबीआय डिजिटल लायब्ररीने यावरून १०० लोकांवर अभ्यास केला. त्यानुसार, यापैकी जवळजवळ एक तृतीयांश लोक महिन्यातून एकदाच त्यांचा टॉवेल स्वच्छ करतात. यापूर्वी, ब्रिटनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, काही लोकांनी कबूल केलं की, ते वर्षातून फक्त एकदाच त्यांचा टॉवेल धुतात. टॉवेल घाणेरडा दिसत नसला तरी त्यावर बरेच बॅक्टेरिया जमा होत राहतात.

टॉवेलचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? 

अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, टॉवेल केवळ आपल्या त्वचेवर आढळणाऱ्या बॅक्टेरियामुळेच नव्हे तर आपल्या पोटात आढळणाऱ्या बॅक्टेरियामुळे देखील लवकर खराब होतो. आंघोळ केल्यानंतरही, बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या शरीरावर राहतात आणि जेव्हा आपण टॉवेलने अंग पुसतो तेव्हा यातील बरेच बॅक्टेरिया किंवा व्हायरस हे टॉवेलला चिकटतात. हाच टॉवेल वापरल्याने आरोग्याचं, त्वचेचं नुकसान होतं. 

जेव्हा टॉवेल सुकविण्यासाठी बाहेर टांगले जातात तेव्हा हवेतील काही घटक आणि बॅक्टेरिया त्यांना चिकटू शकतात. टॉवेल धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील काही बॅक्टेरिया त्यावर जमा होऊ शकतात. बॅक्टेरिया आपल्या टॉवेलवर एक थर तयार करतात, ज्यामुळे टॉवेलचा रंग किंवा स्वरूप देखील बदलतं. जरी तुम्ही टॉवेल नियमितपणे धुतले तरी दोन महिन्यांनंतर रंग फिका पडतो. हे बॅक्टेरियाचं प्रमाण आणि धुण्याच्या सवयींवर अवलंबून आहे. 

टॉवेल किती वेळा धुवावा? 

प्रोफेसर एलिझाबेथ स्कॉट आठवड्यातून एकदा टॉवेल धुण्याची शिफारस करतात. पण असा कोणताही नियम नाही. जर एखादी आजारी असेल, त्याला उलट्या किंवा जुलाब होत असतील तर त्या व्यक्तीने स्वत:चा वेगळा टॉवेल वापरावा आणि तो दररोज धुवावा. 

भारतात केलेल्या एका अभ्यासात, सहभागी झालेल्या २० टक्के लोकांनी सांगितलं की, ते आठवड्यातून दोनदा टॉवेल धुतात. डिटर्जंटमुळे बॅक्टेरिया कपड्यांवर चिकटण्यापासून रोखता येतात आणि व्हायरस निष्क्रिय होतात. स्वच्छता नेहमीच आवश्यक असते. इतर कपड्यांच्या तुलनेत टॉवेल हा जास्त गरम पाण्यात आणि जास्त वेळ धुण्याचा सल्ला देखील दिला जातो. 
 

Web Title: How often should you wash your towel, and how does it affect your health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.