Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोज १ किलोमीटर चालल्यानं महिन्याभरात किती वजन कमी होईल? पाहा किती, कसं चालावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 00:00 IST

Walking Benefits : रोज फक्त १ किलोमीटर चालल्यानं शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते.

व्यस्त लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला वॉक करण्यासाठीही वेळ मिळत नसेल तर ती लाईफस्टाईल तुम्हाला आजारी बनवू शकते.  या आजारांपासून बचावसाठी रोज १ किलोमीटर चालणं खूप गरजेचं आहे. फक्त १ किलोमीटर चालणं तुम्हाला शुल्लक वाटेल पण यामुळे शरीराला बरेच फायदे होतात. रोज १ किलोमीटर चालणं ही एक उत्तम सवय आहे. (How much weight will you lose in a month by walking 1 kilometer)

 रोज १ किलोमीटर चालल्यानं काय फायदे होतील?

शारदा केअर हेल्थ सिटीचे इंटरनल मेडीसिन डायरेक्टर डॉ, चिराग टंडन यांच्या म्हणण्यांनुसार रोज फक्त १ किलोमीटर चालल्यानं शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते. तसंच मन शांत राहतो आणि मेंदूही निरोगी राहतो. १ किलोमीटर वॉक केल्यानं शरीराला काय काय फायदे होतात समजून घेऊ.

 नियमित १ किलोमीटर चालल्यानं शरीराचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मत होते तसंच हृदयाची संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. रोज  १ किलोमीटर चाचलल्यानं वजन कमी करता येतं. रोज चालल्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढते.  यामुळे वेगानं कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ंमहिनाभर तुम्ही रोज १ किलोमीटर चाललात तर २ ते ३ किलो वजन सहज कमी होईल.   दिवसभर एकाच जागेवर बसून काम केल्यानं मानसिक ताण येतो. बसून काम केल्यानं मानसिक ताण-तणाव कमी होतो. जे लोक एकाच जागी बसून काम करतात त्यांना खूपच ताण-तणाव येतो. ताण-तणाव कमी करण्यासाठी रोज फक्त 1 किलोमीटर वॉक करायला हवं. रोज 1 किलोमीटर चाललल्यानं तणाव, डिप्रेशन आणि एंजायटी कमी होते.

झोपेची गुणवत्ता सुधारते

एक्सपर्ट्स सांगतात की रोज 1 किलोमीटर वॉक केल्यानं मानसिक आरोग्य चांगले राहते. वॉक केल्यानं ताण-तणाव, चिंता आणि थकवा कमी होतो. यामुळे मूड चांगला राहतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. शरीर जास्त एक्टिव्ह राहते.

सांधेदुखी कमी होते

नियमित चालण्याचा व्यायाम केल्यानं पायांचे आरोग्य चांगले राहते. रोज 1 किलोमीटर वॉक केल्यानं मांसपेशी एक्टिव्ह राहतात. सांधेदुखीच्या वेदना कमी होतात. डॉक्टर सांगतात की कोणत्याही व्यक्तीला सांधेदुखीच्या वेदना उद्भवत असतील तर कमी वयातच वॉक करायला हवं.

English
हिंदी सारांश
Web Title : Walk 1 km daily: Weight loss, benefits, and how to walk.

Web Summary : Walking 1 km daily boosts health, reduces stress, and aids weight loss. It improves blood circulation, sleep, and joint pain. Aim for consistency!
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल