Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज १ किलोमीटर चालल्यानं महिन्याभरात किती वजन कमी होईल? पाहा किती, कसं चालावं

रोज १ किलोमीटर चालल्यानं महिन्याभरात किती वजन कमी होईल? पाहा किती, कसं चालावं

Walking Benefits : रोज फक्त १ किलोमीटर चालल्यानं शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 00:00 IST2026-03-22T23:53:05+5:302026-03-23T00:00:14+5:30

Walking Benefits : रोज फक्त १ किलोमीटर चालल्यानं शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते.

How much weight will you lose in a month by walking 1 kilometer every day how to walk | रोज १ किलोमीटर चालल्यानं महिन्याभरात किती वजन कमी होईल? पाहा किती, कसं चालावं

रोज १ किलोमीटर चालल्यानं महिन्याभरात किती वजन कमी होईल? पाहा किती, कसं चालावं

व्यस्त लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला वॉक करण्यासाठीही वेळ मिळत नसेल तर ती लाईफस्टाईल तुम्हाला आजारी बनवू शकते.  या आजारांपासून बचावसाठी रोज १ किलोमीटर चालणं खूप गरजेचं आहे. फक्त १ किलोमीटर चालणं तुम्हाला शुल्लक वाटेल पण यामुळे शरीराला बरेच फायदे होतात. रोज १ किलोमीटर चालणं ही एक उत्तम सवय आहे. (How much weight will you lose in a month by walking 1 kilometer)

 रोज १ किलोमीटर चालल्यानं काय फायदे होतील?

शारदा केअर हेल्थ सिटीचे इंटरनल मेडीसिन डायरेक्टर डॉ, चिराग टंडन यांच्या म्हणण्यांनुसार रोज फक्त १ किलोमीटर चालल्यानं शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते. तसंच मन शांत राहतो आणि मेंदूही निरोगी राहतो. १ किलोमीटर वॉक केल्यानं शरीराला काय काय फायदे होतात समजून घेऊ.

 नियमित १ किलोमीटर चालल्यानं शरीराचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मत होते तसंच हृदयाची संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. रोज  १ किलोमीटर चाचलल्यानं वजन कमी करता येतं. रोज चालल्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढते.  यामुळे वेगानं कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ंमहिनाभर तुम्ही रोज १ किलोमीटर चाललात तर २ ते ३ किलो वजन सहज कमी होईल.
 
दिवसभर एकाच जागेवर बसून काम केल्यानं मानसिक ताण येतो. बसून काम केल्यानं मानसिक ताण-तणाव कमी होतो. जे लोक एकाच जागी बसून काम करतात त्यांना खूपच ताण-तणाव येतो. ताण-तणाव कमी करण्यासाठी रोज फक्त 1 किलोमीटर वॉक करायला हवं. रोज 1 किलोमीटर चाललल्यानं तणाव, डिप्रेशन आणि एंजायटी कमी होते.

झोपेची गुणवत्ता सुधारते

एक्सपर्ट्स सांगतात की रोज 1 किलोमीटर वॉक केल्यानं मानसिक आरोग्य चांगले राहते. वॉक केल्यानं ताण-तणाव, चिंता आणि थकवा कमी होतो. यामुळे मूड चांगला राहतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. शरीर जास्त एक्टिव्ह राहते.

सांधेदुखी कमी होते

नियमित चालण्याचा व्यायाम केल्यानं पायांचे आरोग्य चांगले राहते. रोज 1 किलोमीटर वॉक केल्यानं मांसपेशी एक्टिव्ह राहतात. सांधेदुखीच्या वेदना कमी होतात. डॉक्टर सांगतात की कोणत्याही व्यक्तीला सांधेदुखीच्या वेदना उद्भवत असतील तर कमी वयातच वॉक करायला हवं.

Web Title : रोज 1 किलोमीटर चलें: वजन घटाएं, फायदे जानें, चलने का तरीका।

Web Summary : रोज 1 किलोमीटर चलने से स्वास्थ्य सुधरता है, तनाव कम होता है और वजन घटता है। इससे रक्त संचार, नींद और जोड़ों के दर्द में सुधार होता है। निरंतरता का लक्ष्य रखें!

Web Title : Walk 1 km daily: Weight loss, benefits, and how to walk.

Web Summary : Walking 1 km daily boosts health, reduces stress, and aids weight loss. It improves blood circulation, sleep, and joint pain. Aim for consistency!