झोप उघडल्यानंतर आपण सगळ्यात आधी काय करतो तर फोन चाळत बसतो. (Morning habits) अर्ध्याहून जास्त लोक हे चहा पितात तर काही जण आपल्या दिवसाची सुरुवात पाणी पिऊ करतात. आयुर्वेदानुसार सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. (empty stomach water benefits)
बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्याला पोटांचे, पचनाचे किंवा गॅसेसचे त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी सकाळची ही एक चांगली सवय आपल्याला अधिक फायदेशीर ठरु शकते.(morning water drinking habit) आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणं म्हणजे आरोग्यासाठी वरदान. रात्री झोपल्यानंतर आपलं शरीर ६ ते ७ तास अन्न-पाणी ग्रहण करत नाही.(water for glowing skin) त्यामुळे सकाळी डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकदा थकवा किंवा चक्कर आल्यासारखं वाटतं. त्याच मुख्य कारणं म्हणजे डिहायड्रेशन.(morning fitness tips) अशावेळी पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, पचन सुधारते आणि रक्तशुद्ध होऊन त्वचा उजळते.(health benefits of drinking water) पण सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावं? याविषयी प्रसिद्ध योगगुरु आचार्य बालकृष्ण यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर माहिती दिली.
प्रायव्हेट पार्टजवळ खाज येते, आग होते? डॉक्टर सांगतात, ३ कारणं - उशीर झाला तर वाढतो त्रास!
रिकाम्या पोटी किती पाणी पिणे योग्य आहे?
आचार्य बाळकृष्ण सांगतात की, सकाळी सर्वात आधी पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. परंतु अनेकदा काही लोक गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. यामुळे पोटात जडपणा, मळमळ किंवा पोटदुखी सारख्या समस्या उद्भवतात. सकाळी लवकर पाणी प्यायल्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटतं असेल तर शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याचे परिणाम असू शकतात. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे.
सकाळी रिकाम्या पोटी ३०० ते ४०० मिली पाणी म्हणजेच एक ग्लास पाणी प्यायल्या हवे. जर आपल्याला खूप तहान लागली असेल तर २ ते ३ ग्लास पाणी पिऊ शकता. परंतु, तुम्ही एकाच वेळी यापेक्षा जास्त पाणी पिणे टाळावे. पाण्याचे प्रमाण नेहमीच शरीराच्या सोयीनुसार असायला हवे. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. चयापचय सुधारून बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि त्वचेच्या समस्या कमी होतात. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवं.