थंडीच्या दिवसांत आपल्या आहारात साजूक तुपाचे महत्त्व आपोआपच खूप वाढते. आपल्याकडे साजूक तूप हा फक्त एक खाद्यपदार्थ नसून, ते आरोग्य, शक्ती आणि ऊब देणारे औषध मानले जाते. कडक थंडीत साजूक तूप खाल्ल्याने शरीर आतून ऊबदार राहते. हिवाळ्यात शरीराला उष्णता, ऊर्जा आणि पोषणाची अधिक गरज असते. अशावेळी साजूक तूप हे एक अत्यंत उपयुक्त आणि पारंपरिक सुपरफूड मानलं जातं. आयुर्वेदानुसार तूप शरीरातील वातदोष कमी करतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचनशक्ती सुधारतं आणि थंडीमुळे होणारा कोरडेपणा दूर करण्यास मदत करतं( how much ghee should be consumed daily in winter).
परंतु, आजच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये, जेव्हा अनेकजण वाढलेले वजन, कोलेस्ट्रॉल आणि लाईफस्टाईलशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत, तेव्हा मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो, हिवाळ्यात रोज तूप खाणे खरंच फायदेशीर आहे का? आणि जर होय, तर शरीराला पूर्ण लाभ मिळण्यासाठी ते नेमके किती प्रमाणात आणि दिवसाच्या कोणत्या वेळी खाणे सर्वात योग्य आहे? तूप कितीही गुणकारी असलं तरी ते योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतल्यासच त्याचे फायदे मिळतात. जास्त किंवा चुकीच्या वेळी तूप खाल्ल्यास वजनवाढ, पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच हिवाळ्यात साजूक तूप नेमकं किती प्रमाणात खावं आणि दिवसभरात कोणत्या वेळी घेतल्यास त्याचा जास्त फायदा होतो, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांनी एका (how much ghee is safe to eat per day in winter) वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, हिवाळ्यात साजूक तूप किती आणि कधी खावं याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
हिवाळ्यात साजूक तूप खाण्याची योग्य वेळ कोणती ?
आयुर्वेदानुसार साजूक तूप खाण्यासाठी सर्वात चांगली वेळ सकाळची सांगितली गेली आहे. डॉक्टर श्रेय शर्मा यांच्या मते, रात्रभरच्या उपवासानंतर सकाळी आपल्या पोटातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती सर्वात जास्त सक्रिय असते. यावेळी खाल्लेले साजूक तूप दिवसभर शरीरात व्यवस्थित पचते आणि ते पचनशक्ती वाढवण्याचे काम करते. सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि चयापचय क्रियेचा वेग देखील सुधारतो.
ओघळलेले स्तन सुडौल होण्यासाठी घरीच करा ३ सोपे व्यायाम ! परफेक्ट फिगर दिसेल सुंदर...
साजूक तूप कमी अधिक प्रमाणांत खाण्याचे फायदे...
डॉक्टर श्रेय शर्मा सांगतात की, साजूक तूप खाण्याप्रमाणेच ते खाण्याचे प्रमाण देखील योग्य असले पाहिजे. जर कमी प्रमाणात साजूक तूप खाल्ले गेले, तर ते पचनशक्ती मजबूत करते आणि शरीराला पोषण देते. त्याचवेळी, जास्त प्रमाणात तूप खाल्ल्यास अग्नी मंद होऊ शकते, पचनशक्ती हळू होऊ शकते, ज्यामुळे गॅस, अपचन आणि वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
एका दिवसात किती चमचे तूप खावे ?
डॉक्टर श्रेय शर्मा यांच्या मते, लहान मुलांसाठी १ ग्रॅम ते १.५ ग्रॅम तूप पुरेसे असते. प्रौढांसाठी १० ते १५ ग्रॅमपर्यंत तूप फायदेशीर मानले जाते. महिलांसाठी रोज सुमारे ५ ग्रॅम तूप घेणे पुरेसे आहे. आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा स्पष्टपणे सांगतात की, जे लोक व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करत नाहीत, त्यांनी रोज साजूक तूप खाऊ नयेत अशा लोकांमध्ये तूप शरीरात चरबीच्या रूपात जमा होऊ शकते.
डायटिशियन अर्चना जैन यांच्या मते, हिवाळ्यात तूप शरीराला आतून गरम ठेवण्यास मदत करते आणि ते मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचे शोषण करण्यास सहायक ठरते, परंतु संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्या म्हणतात की, तुपाला हेल्दी आहाराचा भाग बनवता येऊ शकते, मात्र त्यासाठी त्या व्यक्तीची कॅलरीजची गरज, शारीरिक हालचाल आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. परंतु, जर कोणाला लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल किंवा पचनसंबंधित समस्या असतील, तर हे प्रमाण आणखी कमी केले जाऊ शकते. त्यामुळे, 'तूप जितके जास्त खाऊ तितका फायदा होईल', असे मानणे चुकीचे आहे.
