वजन कमी करणे असो, शुगरवर नियंत्रण मिळवणे असो किंवा शरीर डिटॉक्स करणे असो; अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात ग्लासभर दुधीचा रस पिऊनच करतात होते. दुधी भोपळा हा आरोग्यासाठी अमृतासमान मानला जातो हे खरं आहे. दुधीमध्ये पाणी, फायबर आणि अनेक पोषक घटक असल्यामुळे तो आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. त्यामुळे काहीजण सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी दुधीचा रस पिण्याचा एक नियम करतात. परंतु कोणताही पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेतला तरच त्याचा फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते, काही वेळा उपाशीपोटी दुधीचा रस पिणे सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. काही लोकांना त्याचा फायदा होतो, तर काहींना पचनाशी संबंधित त्रासही होऊ शकतो. त्यामुळे दुधीचा रस नेमका कधी आणि कसा प्यावा, तसेच सकाळी उपाशीपोटी तो पिणे आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते(is it safe to drink bottle gourd juice on empty stomach).
न्यूट्रिशन वेबसाईट्सनुसार, योग्य पद्धतीने बनवलेला दुधीचा रस पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठता कमी करण्यास, वेट मॅनेजमेंट आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. परंतु, काही रिपोर्ट्स असे सांगतात की, जर दुधी किंवा त्याचा रस चवीला कडू असेल, तर तो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि शरीरात गंभीर समस्या (how much bottle gourd juice should you drink daily) निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत, रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यावा की नाही? आणि रस पिताना कोणती खबरदारी घ्यावी? याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
सकाळी उपाशी पोटी दुधीचा रस पिणं योग्य की अयोग्य ?
हेल्थ आणि न्यूट्रिशन पोर्टल्स नुसार, जर दुधी ताजी, हिरवी, डाग नसलेली आणि चवीला गोड असेल, तरच त्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी घेणे पचनासाठी उत्तम मानले जाऊ शकते. स्रॅप कॅलरी आणि इतर न्यूट्रिशन साइट्सच्या डेटानुसार, १०० मिली दुधीच्या रसात सुमारे १५ कॅलरीज असतात, खूप कमी फॅट, हलके फायबर आणि पोटॅशियम व विटामिन 'सी' सारखी पोषक तत्वे मिळतात, जी दिवसाची सुरुवात हलकी ठेवण्यास मदत करू शकतात. रिकाम्या पोटी दुधीचा रस घेतल्याने पचनक्रिया सुरळीत होऊ शकते, ॲसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ कमी होऊ शकते आणि पोट हलके वाटते, फक्त अट हीच आहे की दुधीचा रस फ्रेश असावा आणि तो कडू नसावा.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये पब्लिश केलेल्या अभ्यासानुसार, आणि ICMR गाईडलाईन्स मध्ये कडू दुधीचा रस प्यायल्याने गंभीर फूड पॉयझनिंगच्या केस नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये उलटी, तीव्र पोटदुखी, रक्ताची उलटी, लो ब्लड प्रेशर आणि मल्टी-ऑर्गन डॅमेज पर्यंतची लक्षणे दिसून आली आहेत. ICMR आणि एक्सपर्ट कमिटीचा स्पष्ट सल्ला आहे की, जर दुधी किंवा त्याचा रस जराही कडू वाटला, तर तो लगेच फेकून द्यावा. रस प्यायल्यानंतर जर अस्वस्थ वाटणे, मळमळणे, उलटी किंवा जुलाब यांसारखी लक्षणे दिसली, तर वेळ न घालवता लगेच हॉस्पिटलमध्ये जावे.
कशाला रात्री उपाशी राहता ‘हे’ खा-रात्री जेवूनही कमी होईल वजन, आहारतज्ज्ञांचा सोपा वेटलॉस मंत्र...
कपभर चहाचं पाणी केसांवर करते जादू, घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय - केसांना येईल काचेसारखी चमक...
दुधीचा रस वेट लॉस आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी किती फायदेशीर ?
कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमधील एक्स्पर्टनी सांगितल्यानुसार, दुधीच्या रसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील हाय वॉटर आणि फायबर कंटेंट, जे पचनक्रियेचे कार्य सुरळीत करण्यास करण्यास आणि बद्धकोष्ठता (Constipation) कमी करण्यास मदत करू शकते. आयुर्वेदिक आणि होलिस्टिक न्यूट्रिशन एक्सपर्ट्स याला 'कूलिंग' आणि 'स्टमक फ्रेंडली' असल्याचे सांगतात, जी ॲसिडिटी, ब्लॉटिंग आणि पोटातील जडपणा यांसारख्या समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरु शकते. विशेषतः जेव्हा हा रस सकाळी कमी प्रमाणात घेतला जातो.
फिटनेस एक्सपर्ट ल्यूक कौटिन्हो यांच्या मते, दुधीच्या रसाचे लो-कॅलरी आणि हाय-व्हॉल्यूम गुणधर्मामुळे याला वेट लॉस डाएटसाठी एक उत्तम ड्रिंक मानले जाते. दुधीचा रस प्यायल्यावर पोट भरलेले वाटते आणि अनहेल्दी स्नॅकिंगची क्रेविंग कमी होते. काही रिव्ह्यूजनुसार, दुधीतील पोटॅशियम आणि फायबरमुळे ब्लड प्रेशर बॅलन्स, कोलेस्ट्रॉल कंट्रोल आणि हार्ट हेल्थसाठीही हे फायदेशीर ठरू शकते. मात्र, हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तुमचा एकूण आहार, झोप आणि ॲक्टिव्हिटी लेव्हल देखील चांगली असेल.
दिवसभरात किती प्रमाणांत दुधीचा रस पिण फायदेशीर ?
स्नॅप कॅलरी आणि काही हॉस्पिटल ब्लॉग्समध्ये उल्लेख केल्यानुसार, निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी दिवसाला १०० ते २०० मिली म्हणजेच (सुमारे अर्धा ते एक ग्लास) रस पिणं पुरेस आहे. अनेक एक्सपर्ट्स असा सल्ला देतात की, सुरुवात ५० ते १०० मिली पासून करावी, त्यानंतर आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो ते पाहावं आणि त्यानंतरच १५० ते २०० मिली पर्यंत जावे, तेही दिवसातून फक्त एकदाच.
Web Summary : Drinking bottle gourd juice has benefits, but bitterness is dangerous. Consume fresh juice in moderation (100-200ml) for best results. Discontinue if adverse effects occur.
Web Summary : लौकी का जूस फायदेमंद है, लेकिन कड़वाहट खतरनाक है। सर्वोत्तम परिणामों के लिए ताज़ा जूस का умеренता (100-200 मिली) में सेवन करें। प्रतिकूल प्रभाव होने पर बंद कर दें।