Join us

एका दिवसाला किती ग्लास पाणी प्यावं? वातावरणानुसार शरीराला किती पाणी प्यायची गरज असते-पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:31 IST

How Many Glass Of Water Drink In A Day : काहीजण दिवसाला ५ ते ६ ग्लास पाणी पितात. रोज कमीत कमी किती पाणी प्यायला हवं समजून घेऊ

पाणी (Water) जीवनाचा एक आधार आहे. आपल्या शरीराचा जवळपास ६० टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. शरीराच्या विविध अवयवांच्या चांगल्या कार्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. एक वयस्कर व्यक्ती दिवसाला ८ ते १० ग्लास म्हणजेच जवळपास  २ ते ३ लिटर पाणी पितो. रोज किती पाणी प्यावं याचं प्रमाण असतं. प्रत्येक व्यक्ती १० ते ११ ग्लास पाणी पिते. काहीजण दिवसाला ५ ते ६ ग्लास पाणी पितात. रोज कमीत कमी किती पाणी प्यायला हवं समजून घेऊ. (How Many Glass Of Water Drink In A Day)

पाणी प्यायल्यानं शरीराचे तापमान  नियंत्रणात राहते आणि शरीर थंड राहण्यासही मदत होते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. त्वचा हायड्रेट राहते याशिवाय त्वचा चमकदार आणि निरोगी होण्यासही मदत होते. टॉक्सिन्स शरीरातून बाहेर निघण्यास मदत होते.

मांसपेशी आणि सांधे लवचिक राहण्यास मदत होते. थकवा कमी होण्यास मदत होते.  विविध कार्यांसाठी पाणी पिण्याची गरज असते. शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांच्या शरीरातून घामाद्वारे अधिक पाणी बाहेर येते  यामुळे १२ ते १५ ग्लास पाणी पिऊ शकतात. 

जे लोक शारीरिक हालचाली कमी करतात. त्यांच्यासाठी पाण्याची आवश्यकता थोडी कमी असते.  ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेची असते. गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी सामान्यपेक्षा अधिक पाणी प्यायला हवं. कमीतकमी  10 ते 12 ग्लास पाणी रोज पाणी प्यायला हवं जेणेकरून शरीरात पाण्याची  कमतरता भासत नाही. 

वातावरणानुसार पाण्याची आवश्यकता बदलते?

ऊन्हाळ्याच्या दिवसांत घाम जास्त येतो. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. यासाठी या वातावरणात सामान्यपेक्षा अधिक पाणी प्यायला हवं. गरमीच्या दिवसांत कमीत कमी १० ते १५ ग्लास पाण्याची शरीराला आवश्यकता असते. 

दुधापेक्षा दसपट कॅल्शियम असलेले ३ पदार्थ, स्वस्तही आणि पौष्टिकही-आयुर्वेदिक तज्ज्ञही सांगतात बळकट हाडांसाठी..

हिवाळ्यात आपल्याला घाम येत नाही म्हणून तहान कमी लागते. याचा अर्थ असा नाही की शरीरात पाण्याची कमतरता आहे. हिवाळ्यात कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीर हायड्रेट राहील आणि मेटाबॉलिझ्म खराब होणार नाही. 

पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, वितळेल चरबी-फिट दिसाल

पावसाळ्याच्या वातावरणात हवेत मॉईश्चर जास्त असल्यामुळे घाम जास्त येतो. ८ ते १० ग्लास पाणी प्या.  पाणी शरीरासाठी फार महत्वाचे असते. शरीर हायड्रेट राहायला हवं, शरीर निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल