सामान्यतः लोक कॅलरीजना लठ्ठपणासाठी जबाबदार मानतात. पण शरीरासाठी कॅलरीजचं योग्य प्रमाणात सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. कॅलरीज म्हणजे आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर एका दिवसात नेमक्या किती कॅलरीज आवश्यक असतात? हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीजची आवश्यकता असते. ही गरज वय, स्त्री-पुरुष, शारीरिक हालचाली आणि आरोग्यााच्या स्थितीवर अवलंबून असते. जास्त किंवा कमी कॅलरीजचं आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात.
शरीरासाठी किती कॅलरीज आवश्यक?
१९ ते ५९ वयोगटातील व्यक्तीला दररोज १,६०० ते ३,००० किलोकॅलरीजची आवश्यकता असते. महिलांना दररोज सुमारे १,६०० ते २,४०० किलोकॅलरीजची आवश्यकता असते, तर पुरुषांना दररोज सुमारे २००० ते ३,००० किलोकॅलरीजची आवश्यकता असते. एकूण वापरल्या जाणाऱ्या कॅलरीजपैकी ४५% ते ६५% कार्बोहाइड्रेटमध्ये, २०% ते ३५% फॅटमधून आणि १०% ते ३५% प्रोटीनमधून यायला हवे.
पुरुषांसाठी
- जर तुम्ही व्यस्त जीवनशैली जगत असाल आणि नियमित शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला दररोज २५०० कॅलरीजची आवश्यकता असते.
- जर तुमची जीवनशैली नॉर्मल असेल तर २२०० कॅलरीजची आवश्यकता आहे.
- आरामदायी जीवनशैलीसाठी तुम्हाला २००० कॅलरीजची आवश्यकता आहे.
महिलांसाठी
- सक्रिय जीवनशैली असलेल्या महिलांना २००० कॅलरीजची आवश्यकता आहे.
- नॉर्मल शारीरिक हालचाली करणाऱ्या महिलांसाठी १८०० कॅलरीजची आवश्यकता आहे.
- जर एखाद्या महिलेची जीवनशैली खूपच कमी सक्रिय असेल तर १६०० कॅलरीज पुरेशा आहेत.
कॅलरीजचा वजनावर होणारा परिणाम
- जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमचं कॅलरीजचं प्रमाण कमी करावं लागेल. वजन कमी करण्यासाठी, शरीराला आवश्यक पोषक तत्वं मिळत राहावीत म्हणून निरोगी संतुलन राखून कॅलरीज कमी करणं उचित आहे.
- जर तुमचं वजन खूप कमी असेल आणि तुम्हाला ते वाढवायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कॅलरीजचं प्रमाण वाढवावं लागेल. यासाठी उच्च कॅलरीज असलेला सकस आहार घेऊ शकता.