Join us

अन्न शिजल्यानंतर कधीपर्यंत खाण्यायोग्य असते? पदार्थ किती वेळानं शिळा होतो-श्री श्री रवीशंकर सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:15 IST

How long is food edible after cooking, How long does it take for food to go stale : आयुर्वेदानुसार ताजं, हलकं, रसदार, स्निग्धन अन्न सात्विक मानलं जातं.

आजकालच्या धावपळीच्या जगात लोक त्यांच्या सोयीनुसार जंक फूड  खातात किंवा एकदा केलेलं जेवण वारंवार गरम करून खातात.  यामुळे अन्नाला चांगली चव तर लागते पण मन अशांत होतं. लहान मुलं आणि तरूणांच्या आरोग्यावरही याचा चुकीचा परीणाम होतो. फ्रेंच फ्राईज, सॉसेस, तळलेले अन्न हळूहळू डिप्रेशनसारख्या अनेक आरोग्याच्या समस्याांचे कारण बनते. (How long is food edible after cooking)

अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर सांगतात की सात्विक अन्न बनवल्याबरोबर लगेच खायला हवं. कारण 8 तासांनी हे अन्न राजसिक होते त्यानंतर तामसिक, आयुर्वेदातली ही शिकवण अनुभवांवर आधारीत आहे. चांगलं अन्न शरीराला एनर्दी देते याशिवाय मन, बुद्धी आणि भावनांवरही याचा परीणाम होतो. म्हणून असं म्हटलं जातं की जसं अन्न तसं मन, सात्विक अन्न आपल्यातही सात्विकता आणते. तामसिक भोजन मानसिक असंतुलन आणि शारीरिक रोगांना निमंत्रण देते. (How long does it take for food to go stale)

शिजवल्यानंतर लगेचच अन्न खाण्याचे फायदे?

आयुर्वेदानुसार ताजं, हलकं, रसदार, स्निग्धन अन्न सात्विक मानलं जातं. अन्न शिजल्यानंतर काही तासातंच खायला हवं. ज्यामुळे त्यात प्राणशक्ती बनून राहते. यामुळे शरीराला ताकद मिळण्याबरोबरच मन स्थिर राहतं. तसंच खूपवेळ आधी शिजवलेलं अन्न खाल्ल्यास चिडचिडेपणा, चिंता आणि असंतुलन येतं.

शिळं अन्न खाण्याचे नुकसान

शिळं अन्न खाल्ल्यानं मन आणि शरीर दोन्ही सुस्त होते. थंड किंवा वारंवार गरम केलेलं जेवण पचायला जड असते. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. जे अनेक आजारांचं कारण ठरतात. तुम्हालाही पचनाचे त्रास होत असतील तर तुम्ही काय खाता, किती खाता याबरोबरच कोणत्या वेळेला जेवता याकडेही लक्ष द्यायला हवं.वेळेवर जेवणं खूप महत्वाचं आहे.  ज्यामुळे पचनशक्ती चांगली राहते. आयुर्वेदानमुसार वेळोवेळी सात्विक अन्न मानसिक शांती वाढवते. (Ref) मुलांना तुम्ही जे खायला देता त्याचा  मानसिक आरोग्यावरही परीणाम होत असतो. सात्विक अन्न, मन आणि बुद्धी शुद्ध ठेवते. हेल्दी जेवण मेटाबॉलिझ्म, एनर्जी आणि दीर्घकाळ एनर्जेटीक राहण्यासाठी गुणकारी ठरते. आपण जे काही खातो त्याचा आपले विचार, उर्जा आणि व्यक्तिमत्वावर परीणाम होतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सअन्नआरोग्य