Fennel Water : सकाळी उपाशीपोटी बडीशेपचं पाणी पिण्याच्या सवयीनं पचन सुधागतं, मेटाबॉलिज्म सुधारतं आणि हार्मोन बॅलन्समध्येही सुधारणा होते. इतकंच नाही तर बडीशेपचं पाणी नियमित प्याल तर शरीरही डिटॉक्स होतं. आयुर्वेदात बडीशेपला एक औषधी मानण्यात आलं आहे. म्हणूनच अनेक उपचारांमध्ये बडीशेपचा वापर केला जातो.
पोटासाठी फायदेशीर
बडीशेपनं गॅस, ब्लोटिंग, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. जेवण झाल्यावर बडीशेप चावून खाल्ल्यानं किंवा सकाळी उपाशीपोटी याचं पाणी प्यायल्यानं पचन तंत्र सुधारतं आणि शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात.
वजन कमी होईल
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर बडीशेप आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कारण बडीशेपनं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, भूक कंट्रोल होते आणि ब्लोटिंगही कमी होते.
महिलांसाठी फायदेशीर
बडीशेप महिलांसाठी देखील खूप फायदेशीर असते. यानं ब्रेस्ट मिल्क वाढतं, मासिक पाळीतील वेदना कमी होतात, आणि हार्मोन्समध्ये बॅलन्स राहतो. इतकंच नाही तर मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासही मदत मिळते.
मॉडर्न सायन्समध्ये बडीशेपच्या गुणांबाबत सांगण्यात आलं आहे. यातील अॅंटी-ऑक्सीडेंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी करतात. ज्यामुळे कोशिकांचं नुकसान होत नाही. अशात डायबिटीस, हार्ट डिजीज आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
कसा कराल वापर?
- रात्री एक ग्लास पाण्यात २ चमचे बडीशेप भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी प्या आणि बडीशेप चावून खा.
- बडीशेप हलकी बारीक करा आणि एक कप पाण्यात उकडून घ्या. हे पाणी कोमट असल्यावर उपाशीपोटी प्या. यानं डायजेशन चांगलं होतं.
- वजन कमी करायचं असेल तर जेवणाच्या ३० मिनिटांआधी बडीशेपचं पाणी पिऊ शकता.