Deep Breathing Benefits In Sleeping : झोप न ही अनेकांची समस्या आहे. जर रात्री झोप येत नसेल डोक्यात वेगवेगळे विचार गोंधळ घालत असतील, तर याचा तब्येतीवर मोठा वाईट प्रभाव पडू शकतो. जर तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य मजबूत ठेवायचं असेल, तर झोपेची क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी डीप ब्रीदिंग म्हणजेच मोठा श्वास घेण्याची सवय लावल्यास झोपेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. अशात डीप ब्रीदिंग करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे काही जबरदस्त फायदे जाणून घेऊया.
नियम पाळा
आधी तर बेडवर सरळ झोपा आणि डोळे हलकेच बंद करा. डीप ब्रीदिंगसाठी ४-७-८ हे तंत्र सर्वात प्रभावी मानलं जातं. सर्वात आधी ४ सेकंद हळूहळू श्वास घ्या, त्यानंतर ७ सेकंद श्वास रोखून ठेवा आणि मग ८ सेकंदात तोंडातून हळूहळू श्वास सोडा. ही प्रक्रिया सुमारे ५ मिनिटे करा.
महत्त्वाची गोष्ट
जर तुम्हाला ७ सेकंद श्वास रोखून ठेवणं कठीण वाटत असेल, तर ४-४-४ तंत्र वापरू शकता. बेडवर सरळ झोपून डोळे बंद करा. मग ४ सेकंद श्वास घ्या, ४ सेकंद श्वास रोखा आणि ४ सेकंदांत हळूहळू तोंडातून श्वास सोडा. डीप ब्रीदिंग केल्यानं मन शांत होण्यास मदत होते.
आरोग्यासाठी फायदेशीर
डीप ब्रीदिंग केल्यानं ताण, चिंता आणि जास्त विचार कमी होण्यास मदत होते. तसेच नर्व्हस सिस्टीम शांत राहते. चांगल्या झोपेसाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त ५ मिनिटं मोठा श्वास घ्या, काही दिवसांतच त्याचा सकारात्मक परिणाम जाणवू लागेल. शरीर आणि मेंदूचा थकवा कमी करण्यासाठीही डीप ब्रीदिंग उपयुक्त ठरते. खोल श्वास घेतल्याने स्नायूंनाही आराम मिळतो.
Web Summary : Struggling to sleep? Deep breathing, especially the 4-7-8 or 4-4-4 technique, can calm your mind and reduce stress. Practicing this nightly for just five minutes improves sleep quality, relaxes muscles, and relieves mental fatigue. A simple, effective remedy for better sleep.
Web Summary : झोप येत नाही? 4-7-8 किंवा 4-4-4 तंत्राने दीर्घ श्वास घेतल्यास मन शांत होते आणि तणाव कमी होतो. रात्री फक्त पाच मिनिटे याचा सराव केल्यास झोप सुधारते, स्नायू शिथिल होतात आणि मानसिक थकवा दूर होतो.