Water Drinking Method : आजच्या धावपळीच्या जीवनात आपण छोट्या-छोट्या सवयींकडे दुर्लक्ष करतो. ऑफिसमध्ये, घरी किंवा बाहेर अनेकदा लोक उभ्याउभ्याच पाणी पितात. असं करून काही नुकसान होऊ शकतं, याचा काही विचारच केला जात नाही. पण आयुर्वेद आणि आरोग्याशी संबंधित मान्यतांनुसार, जितकं पाणी पिणं महत्वाचं आहे, तितकीच पाणी पिण्याची पद्धतही महत्वाची असते. उभं राहून पाणी पिण्याची सवय हळूहळू शरीराला हानी पोहोचवू शकते.
आपण शांतपणे बसून पाणी पितो तेव्हा शरीराला ते हळूहळू शोषून घेण्यास वेळ मिळतो. पण उभं राहून पाणी प्यायल्यास ते वेगाने खाली जाते आणि शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही. याचा परिणाम हळूहळू आरोग्यावर दिसू लागतो.
आयुर्वेदानुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचा समतोल बिघडू शकतो. पाणी योग्य ठिकाणी वापरले जाण्याऐवजी सांधे आणि गुडघ्यांच्या आजूबाजूला साचू लागते. त्यामुळे कमी वयातच गुडघेदुखी, जडपणा आणि सांध्यांचे त्रास सुरू होऊ शकतात.
बसून पाणी प्यायल्यास शरीर ते गाळून पुढे पाठवते. पण उभं राहून पाणी प्यायल्याने ते थेट किडनीपर्यंत पोहोचतं, ज्यामुळे किडनीवर जास्त ताण येतो. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास किडनीसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी पोटात वेगाने पडतं आणि पचनक्रिया बिघडते. यामुळे गॅस, अॅसिडिटी, पोटात जळजळ, बद्धकोष्ठता आणि जडपणासारख्या तक्रारी वाढू शकतात. शरीर पाण्याचा योग्य वापर करू शकत नसेल, तर त्याचा परिणाम ऊर्जा आणि ताकदीवरही होतो. थोडेसे काम केले तरी थकवा जाणवतो आणि शरीर सुस्त वाटू लागते.
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी आरामात बसून पाणी प्या, घोट-घोट करून प्या, घाई करू नका, खूप थंड पाणी टाळा, सामान्य तापमानाचे पाणी अधिक योग्य असते आणि काच किंवा मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे फायदेशीर ठरते.
