Alum For Yellow Teeth : दात पिवळे होण्याची समस्या अलिकडे अनेकांना होते. सोबतच तोंडाची दुर्गंधी किंवा हिरड्यांमध्ये वेदना याही समस्या कॉमन झाल्या आहेत. अशात लोक वेगवेगळे महागडे माउथवॉश किंवा टूथपेस्ट वापरतात. पण यांमुळे काही समस्या नेहमीसाठी दूर होत नाही. यावर काही नॅचरल किंवा घरगुती उपाय देखील आहेत. असाच एक उपाय म्हणजे तुरटी. आता सामान्यपणे तुरटी त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी आणि तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी सुद्धा तुरटीचा (How to use alum for yellow teeth) वापर होऊ शकतो. आज आपण तेच पाहणार आहोत.
आयुर्वेद डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, जर्नल ऑफ क्लीनिकल अॅन्ड डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, तुरटीच्या पाण्यानं गुरळा केल्यास दात आणि हिरड्या निरोगी राहतात. कारण तुरटीमध्ये नॅचरल अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-सेप्टिक गुण असतात. जे तोंडातील खराब बॅक्टेरिया नष्ट करतात.
तुरटीचे दातांना होणारे फायदे
तुरटीच्या पाण्यानं नियमितपणे गुरळा केला तर दातांवरील पिवळेपणा दूर होता आणि दातांवर जमा झालेला प्लाक देखील कमी होतो. तसेच हिरड्यांमध्ये होणारं इन्फेक्शन देखील कमी होतं. तोंडात जर फोड येत असतील किंवा तोंडाची दुर्गंधी येत असेल ती सुद्धा यानं दूर होते.
कसा कराल वापर?
तुरटीचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा ग्लास पाण्यात चिमुटभर तुरटीची पावडर मिक्स करा. ती चांगली मिक्स करून या पाण्यानं दिवसातून एक ते दोन वेळा गुरळा करा. हे पाणी प्यायचं नाहीये, केवळ गुरळ करायचा आहे. काही दिवसातच आपल्याला फरक दिसून येईल.
काय काळजी घ्याल?
डॉक्टर सांगतात की, तुरटीचा वापर फक्त गुरळा करण्यासाठी करा. ही पावडर थेट दातांवर घासू नका. असं केल्यास दातांचं नुकसान होऊ शकतं. जर हिरड्यांमध्ये जास्त वेदना असतील किंवा रक्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.