Join us   

Housework lead to sharper memory : रोज घरकाम केल्यानं स्मरणशक्ती राहते तल्लख; रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 3:12 PM

Housework lead to sharper memory : एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, घरकाम करणार्‍या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली राहते.

 'कामाला जातेस म्हणून काय झालं? बाईनं घरातलं सगळं करून बाहेरची काम करायला हवीत',असे सल्ले प्रत्येक काम करणाऱ्या  महिलांना मिळत असतात. ती गृहीणी असो किवा वर्किंग वूमन घरकामाची पाठ काही सुटत नाही. अनेकांच्या घरात महिला वगळता इतरांना घरची कामं करण्यात काहीच रस नसतो. नाईलाजानं म्हणा किंवा आवडीनं घरच्या स्त्रीयांना रोजची सगळी कामं आवरावी लागतात. यामुळे प्रत्येकीला स्वत:साठी वेळ मिळतोच असं नाही. त्यापेक्षा घरातील वृद्धांनी थोडाफार घरकामाला हातभार लावला तर त्यांनाही फायदा होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल फायदा  कसा?

एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, घरकाम करणार्‍या वयस्कर व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली राहते.  या अभ्यासाचे निष्कर्ष बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. या अभ्यासात असे आढळून आले की वृद्ध लोकांनी घराची साफसफाई केल्यास किंवा इतर कामात मदत केल्यास  स्मरणशक्ती चांगली राहते. 

सिंगापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील आरोग्य आणि सामाजिक विज्ञानांचे प्राध्यापक, अभ्यासाचे सह-लेखक शिओ-लियांग वी म्हणाले, "सक्रिय राहणं म्हणजे मनोरंजक गोष्टींसाठी दिलेला वेळ किंवा शारीरिक क्रियाकलाप नाही. घरकाम हे अनेक वृद्ध प्रौढांद्वारे केले जाणारे एक उद्देशपूर्ण क्रियाकलाप आहे ज्यामुळे त्याचं शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.''  

घरकाम हे ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या पायाच्या ताकदीशी निगडीत आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा वाढत्या वयात निष्क्रीय राहण्याचा धोका कमी होतो. संशोधकांनी असे नमूद केले की त्यांच्या अभ्यासातून हे सिद्ध होत नाही की घरकामामुळे तीक्ष्ण विचारसरणी किंवा चांगले संतुलन होते, हा फक्त एक दुवा असल्याचे दिसून येते.

या अभ्यासासाठी, संशोधकांनी 21 ते 90 वर्षे वयोगटातील जवळपास 500 निरोगी सिंगापूरमधील नागरिकांचा शोध घेतला.  शारीरिक क्षमतेचे संकेत म्हणून चालणे आणि खुर्चीवरून उठण्याची क्षमता आणि अल्प आणि विलंबित स्मरणशक्ती, भाषा, कालावधी आणि मानसिक क्षमता मोजण्यासाठी चाचण्या केल्या. सहभागींना त्यांनी केलेल्या घरगुती कामांबद्दल आणि इतर प्रकारच्या शारीरिक हालचालींबद्दल देखील विचारले गेले.

एका गटात हलक्या घरकामात भांडी धुणे, धूळ साफ करणे, बेड  लावणे, कपडे धुणे, इस्त्री करणे,कपडे  नीटनेटके करणे आणि स्वयंपाक करणे समाविष्ट होते. तर जड घरकामामध्ये खिडकी साफ करणे, लादी पूसणे, मोपिंग करणे आणि पेंटिंग , दुरुस्तीच्या कामांचा  समावेश होता. तरुण सहभागींपैकी, 36% तरूण लोकांनी सांगितले की ते 48% वृद्ध सहभागींप्रमाणेच संशोधकांनी निर्धारित केलेल्या फायदेशीर उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी पुरेशी शारीरिक क्रियाकलाप करतात.

61% तरुण आणि 66% वृद्ध सहभागींनी हे लक्ष्य केवळ घरकामाच्या माध्यमातून पूर्ण केले, असे अभ्यासात दिसून आले. शारीरिक हालचालीं लक्षात घेतल्यानंतर, संशोधकांना असे आढळून आले की घरातील काम ही तीक्ष्ण मानसिक क्षमता आणि चांगल्या शारीरिक क्षमतेशी जोडलेले होते आणि वृद्ध सहभागींपैकी ज्यांनी घरकाम केले नव्हते त्याच्यांत एकदा बसल्यानंतर उठण्यासाठी लागणार वेळही जास्त होता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमानसिक आरोग्यसंशोधन