Join us

अलर्ट! गरमागरम चहा आणि कॉफी पिणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; होऊ शकतो कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:11 IST

जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने होते.

भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने होते. हिवाळ्यात या हॉट ड्रिंक्सची फ्रीक्वेन्सी वाढते. पण तुम्हाला माहीत आहे का की उपाशी पोटी गरम चहा किंवा कॉफी घेतल्याने कॅन्सर होऊ शकतो? जर तुम्हालाही चहा-कॉफी आवडत असेल तर तुमच्यासाठी ही वाईट बातमी आहे.

एका नव्या रिसर्चमध्ये एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, गरम चहा आणि कॉफी दीर्घकाळ प्यायल्याने पोट आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. फक्त चहा आणि कॉफीच नाही तर कोणत्याही गरम पेयाचं अतिसेवन केल्याने तुमचा अन्ननलिका कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

खूप गरम चहा पिऊ नका

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या स्टडी रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, ६५ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम पेय माणसांसाठी कार्सिनोजेनिक असू शकतं, म्हणजेच अशा गरम चहा किंवा कॉफीमुळे पोट आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.

जास्त गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिका देखील खराब होऊ शकते, गरम गरम चहा, कॉफीसोबत अनेकांना धूम्रपान करण्याची देखील सवय असते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका हा आणखी वाढू शकतो.

इराणमध्ये झालेल्या एका रिसर्चवर हा रिपोर्ट आधारित आहे, ज्यामध्ये असं आढळून आलं की, जे लोक दररोज ७०० मिली गरम चहा पितात त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका ९० टक्क्यांनी वाढतो. हा धोका कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गरम पेय पिण्यापूर्वी ते थोडं थंड होऊ देणं.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य