दातांची स्वच्छता आपण अगदी राेजच न चुकता करतो. बहुतांश लोक तर दिवसातून दोन वेळा ब्रश करतात. पण तरीही त्यांच्या दातांवर एक पिवळट झाक असते. रोज घासूनही दात स्वच्छ होत नसतील, पांढरेशुभ्र दिसत नसतील तर पुढे सांगितलेला एक उपाय अगदी रोजच्या रोज करायला सुरुवात करा. यामुळे दातांचा पिवळटपणा कमी होऊन त्यांच्यावर छान चमक तर येईलच पण दात दुखणे, दाढा ठणकणे असे त्रासही कमी होतील आणि दात बळकट होण्यास मदत होईल.(Homemade Solution for Strong White Teeth)
दातांवर चमक आणण्यासाठी घरगुती उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाणी आणि इतर फक्त २ पदार्थ लागणार आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी तर एक काचेची बरणी घ्या. ती घासून स्वच्छ धुवून घ्या आणि तिच्यामध्ये अर्धा लीटर पिण्याचे पाणी घाला.
जेवणाआधी आल्याचा छोटासा तुकडा चावून खाणं म्हणजे 'या' त्रासापासून कायमची सुटका, वाचा २ मोठे फायदे
आता या पाण्यामध्ये तुरटीचे २ लहान खडे घाला आणि १२ ते १५ लवंग घाला. यानंतर बाटलीचं झाकण लावून पाणी हलवून घ्या. साधारण एक दिवस झाल्यानंतर पाण्यातली तुरटी विरघळलेली असेल आणि लवंगाचा अर्कही पाण्यात उतरलेला असेल. हे झालं तुमचं पाणी तयार. आता त्याचा वापर कसा करायचा ते पाहुया..
दातांच्या स्वच्छतेसाठी आपण जे पाणी तयार केलेलं आहे त्याचा वापर करणं अतिशय सोपं आहे. रात्री झोपण्यापुर्वी एकदा टुथब्रश दातांवर फिरवून दात स्वच्छ करून घ्या.
शेफ संजीव कपूर सांगतात ३ टिप्स-कारल्याचा कडूपणा गायब आणि भाजी होईल चमचमीत
यानंतर आपण तयार केलेलं पाणी तोंडात घ्या. ३० सेकंद ते तसंच तोंडात राहू द्या आणि आतल्याआत सगळीकडे फिरवा. यानंतर ते पाणी फेकून द्या. हा एवढा साधा आणि सोपा उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा. दातांच्या कित्येक तक्रारी कमी हाेऊन त्यांच्यावर छान चमक येईल. एकदा ट्राय करून बघाच.
Web Summary : Gargling with a special water made with alum and cloves can help remove yellow stains, strengthen teeth, reduce pain, and give you a brighter smile. Use it regularly after brushing for best results.
Web Summary : फिटकरी और लौंग से बने खास पानी से गरारे करने से दांतों का पीलापन दूर होता है, दांत मजबूत होते हैं, दर्द कम होता है और आपको मिलती है चमकदार मुस्कान। सर्वोत्तम परिणामों के लिए ब्रश करने के बाद नियमित रूप से इसका उपयोग करें।