Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांना कीड लागून काळी छिद्रही पडली? ‘या’ पावडरनं १ मिनिट दात घासणं फायद्याचं

दातांना कीड लागून काळी छिद्रही पडली? ‘या’ पावडरनं १ मिनिट दात घासणं फायद्याचं

Homemade Ayurvedic Powder For Teeth Cavity : ओरल हेल्थकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:50 IST2025-08-22T12:34:19+5:302025-08-22T13:50:24+5:30

Homemade Ayurvedic Powder For Teeth Cavity : ओरल हेल्थकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Homemade Ayurvedic Powder For Teeth Cavity And Pyorrhea Solution For Teeth Cavity | दातांना कीड लागून काळी छिद्रही पडली? ‘या’ पावडरनं १ मिनिट दात घासणं फायद्याचं

दातांना कीड लागून काळी छिद्रही पडली? ‘या’ पावडरनं १ मिनिट दात घासणं फायद्याचं

तोंडातून दुर्गंध येणं, हिरड्यांमधून रक्त येणं, दातांवर पिवळा थर तयार होणं, हिरड्या कमकुवत होणं, पायरीया, दातांमध्ये कीड लागणं अशा बऱ्याच समस्यांमुळे लोक त्रस्त असतात. अनेकदा दिवसरात्र ब्रश करूनही अशा समस्यांपासून आराम मिळत नाही. (Oral Health Tips) ओरल हेल्थकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Homemade Ayurvedic Powder For Teeth Cavity And Pyorrhea)

तुम्ही जे काही खाता-पिता त्याचे कण दातांच्या मुळांना चिकटतात हळूहळू हिरड्यांमध्ये शिरतात. याचे रुपांतर प्लाक किंवा टार्टरमध्ये होते. जे दातांचा पिवळेपणा आणि किडण्याचे कारण ठरते. अनेकदा स्मोकींग आणि दारू प्यायल्यामुळेही दात खराब होतात. (Homemade Ayurvedic Powder For Bad Breathe) दात आणि हिरड्या मजबूत बनवण्यासाठी कडुलिंब आणि हळदीचा वापर तुम्ही करू शकता. न्युट्रिशनिस्ट वैशाली पाटीलनं घरात तयार केल्या जाणाऱ्या या पावडरबद्दल सांगितलं आहे. ही पावडर तुम्ही दंत मंजनप्रमाणे वापरू शकता.

पावडर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागेल?

50 ग्रॅम कडुलिंबाची पावडर

२५ ग्रॅम लवंगाची पावडर

२५ ग्रॅम हळदीची पावडर

२५ ग्रॅम सैंधव मीठ

२५ ग्रॅम बेकिंग सोडा

हा उपाय कसा करायचा?

कडुलिंबाची काही पानं तोडून वाटून त्याची पावडर बनवा. नंतर सर्व पदार्थ एका वाटीत व्यवस्थित एकत्र करा. तुमची आयुर्वेदीक डेंटल पावडर बनून तयार आहे. हे मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. हे मिश्रण तुम्ही दिवसातून २ वेळा दातांवर लावू शकता. सकाळी आणि रात्री याचा वपर करा. एक चमचा पावडर हातांवर घेऊन ब्रश करा. नंतर गुळण्या करा. मग २-३ मिनिटं हलक्या हातानं मसाज करा. कडुलिंबाची पानं किंवा काडी ही दातांची सुरक्षा करण्यात फायदेशीर ठरते. दातांना कीड लागणं, दात पिवळेपणा या समस्या कमी होतात.


या गोष्टीची काळजी घ्या

तज्ज्ञ सांगतात की जेव्हा तुम्ही या पावडरचा वापर करता तेव्हा रेग्युलर वापरली जाणारी टुथपेस्ट वापरू नका. फक्त यात आयुर्वेदीक पावडरचा वापर करा. जेणेकरून चांगला परीणाम मिळेल. एक्सपर्ट्सच्यामते या आयुर्वेदीक पावडरचा नियमित वापर केल्यानं दातांच्या बऱ्याच समस्या जसं की दात दुखणं, हिरड्यांमधून रक्त येणं, संक्रमण या पासून सुटका मिळू शकते. 

Web Title: Homemade Ayurvedic Powder For Teeth Cavity And Pyorrhea Solution For Teeth Cavity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.