Join us
Daily Top 2 Weekly Top 5

घोरण्याची सवय होईल बंद करा फक्त ५ उपाय-रात्री लागेल शांत झोप, घोरणं होईल कायमचं बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:00 IST

Snoring Problem Managed Naturally : बाजारात घोरणे कमी करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली, तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नैसर्गिक पद्धतीनेही घोरण्यावर नियंत्रण ठेवता येतं. चला तर जाणून घेऊया घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय कोणते आहेत.

Snoring Problem Managed Naturally : आपल्यापैकी अनेकांना झोपेत घोरण्याची समस्या असते. गाढ झोपेतही नकळत घोरण्याचा आवाज येतो. ही समस्या सामान्य वाटत असली तरी काही केसेसमध्ये आरोग्य तज्ज्ञ याकडे गंभीरपणे पाहण्याचा सल्ला देतात. कारण काही वेळा घोरणे हे गंभीर आजारांचे संकेत असू शकते. जे लोक बऱ्याच दिवसांपासून घोरण्याच्या त्रासाने ग्रस्त आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

खरं तर, जी व्यक्ती घोरते तेव्हा त्याला याची जाणीव होत नाही, पण त्याच्या शेजारी झोपणाऱ्यांसाठी हे खूप त्रासदायक ठरते. यामुळे झोपेत अडथळा येतो आणि चिडचिड वाढते. म्हणजे बाजूला असलेल्या व्यक्तीच्या झोपेचं खोबरं होतं.

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जे लोक खूप थकलेले असतात, त्यांच्यात हिवाळ्यात नाक बंद होणे, घसा खवखवणे आणि कफ वाढणे यामुळे घोरण्याची समस्या अधिक वाढते. 18 वर्षांवरील साधारण 45 टक्के लोकांमध्ये घोरण्याची समस्या आढळते. जरी बाजारात घोरणे कमी करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली, तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नैसर्गिक पद्धतीनेही घोरण्यावर नियंत्रण ठेवता येतं. चला तर जाणून घेऊया घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय कोणते आहेत.

झोपण्याच्या सवयींकडे लक्ष द्या

घोरणे कमी करण्यासाठी सर्वात आधी झोपण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत. पाठीवर झोपल्यास जीभ आणि टाळू एकमेकांना चिकटू शकतात, त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते आणि घोरणे वाढू शकते. त्यामुळे कुशीवर झोपणे अधिक योग्य ठरते. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे घशातील स्नायूंवर परिणाम होतो आणि त्यामुळे घोरण्याची समस्या वाढू शकते.

उशी स्वच्छ ठेवा

अनेक लोक उशीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, पण हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. उशीमध्ये साचलेली धूळ, मळ आणि मृत त्वचेच्या पेशींमुळे अ‍ॅलर्जी आणि नाक बंद होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. प्रत्येक दोन आठवड्यांनी उशी उन्हात वाळवा आणि उशीचे कव्हर नियमित धुवा. झोपताना डोके थोडे उंच ठेवले तर श्वास घेणे सोपे होते आणि घोरणे कमी होण्यास मदत होते.  

काही घरगुती उपाय

1) एक कप कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिश्रित करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण प्यावे. 

2) रोज झोपण्याआधी कोमट पाण्यात वेलची पावडर मिश्रित करून प्यावे. यानेही घोरण्याची समस्या कमी होते. 

3) हळद ही अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. रोज झोपण्याच्या अर्धातासआधी हळद घातलेलं दूघ प्यावे. यानेही घोरण्याची समस्या कमी होईल.

4) झोपण्यापूर्वी पाण्यात पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुरळा करा. याने नाकाच्या छिद्रांवरील सूज कमी होईल आणि श्वास घेण्यास सोपं होईल. 

झोपण्याची स्थिती बदला

पाठीवर झोपणे चांगले मानले जाते. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, पाठीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता वाढते. कारण पाठीवर झोपल्याने तुमचा टाळू आणि जीभ गळ्यातील वरच्या भागात येतात. त्यामुळे मोठ्या आवाजात ध्वनी उत्पन्न होतो आणि तोच आवाज घोरण्यात बदलतो. यामुळेच सरळ पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा. कुशीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता कमी होते.

वजन कमी करा

घोरणारे अनेक लोक स्थूल असतात. स्थुलतेमुळे गळ्याजवळ खूप अधिक फॅट्स जमा होतात. त्यामुळे गळ्याजवळील पेशी आकूंचन पावतात आणि हेच घोरण्याचे मोठे कारण ठरते. यापासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार वजन घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Stop Snoring: 5 Natural Remedies for Peaceful Sleep

Web Summary : Snoring can indicate serious health issues. Improve sleep habits, clean pillows, and try home remedies like turmeric milk or honey to reduce snoring. Sleeping on your side and weight management also helps.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स