Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवण केल्यावर लगेच पोट फुगतं किंवा गॅस होतो? लगेच करा 'हा' खास उपाय

जेवण केल्यावर लगेच पोट फुगतं किंवा गॅस होतो? लगेच करा 'हा' खास उपाय

Bloating and gas home remedies : आज आम्ही पोटासंबंधीही समस्या दूर करणारा एक जुना घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. जो करून नेहमीच पोट फुगण्याची तुमची समस्या लगेच दूर होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:37 IST2025-06-05T14:06:02+5:302025-06-05T18:37:35+5:30

Bloating and gas home remedies : आज आम्ही पोटासंबंधीही समस्या दूर करणारा एक जुना घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. जो करून नेहमीच पोट फुगण्याची तुमची समस्या लगेच दूर होईल.

Home remedies to get rid of bloating and gas problem | जेवण केल्यावर लगेच पोट फुगतं किंवा गॅस होतो? लगेच करा 'हा' खास उपाय

जेवण केल्यावर लगेच पोट फुगतं किंवा गॅस होतो? लगेच करा 'हा' खास उपाय

Bloating and gas home remedies : काहीही खाल्ल्यावर पोट फुगणं किंवा गॅस होणं ही महिलांमध्ये आढळणारी सगळ्यात कॉमन समस्या आहे. अशात ही समस्या दूर करण्यासाठी लगेच औषध घेतलं जातं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आधी औषधांऐवजी आपल्या आज्ज्या वेगवेगळे नॅचरल उपाय करून ही समस्या दूर करत होत्या. हे उपाय खूप सोपे आणि प्रभावी असायचे. अशात आज आम्ही पोटासंबंधीही समस्या दूर करणारा एक जुना घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. जो करून नेहमीच पोट फुगण्याची तुमची समस्या लगेच दूर होईल.

आजीबाईच्या बटव्यातून बाहेर आलेला उपाय पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी बेस्ट उपाय आहे. यात काही गोष्टींचं मिश्रण असतं जे पोट फुगण्याची आणि गॅसची समस्या दूर करतं. इतकंच नाही तर या उपायानं तुमची पचनक्रिया सुद्धा चांगली होते. हा उपाय वेट लॉस एक्सपर्ट आंचन चुघ यांनी इन्स्टावर शेअर केला आहे.

काय लागेल साहित्य?

जिरे 2 चमचे

ओवा 2 चमचे

बडीशेप 2 चमचे

धणे 2 चमचे

काळं किंवा सैंधव मीठ अर्धा चमचा

कसं कराल तयार?

या सगळ्या गोष्टी ताव्यावर चांगल्या भाजून घ्या आणि नंतर मिक्सरमधून बारीक करा. पोट फुगण्याची समस्या दूर करणारा उपाय तयार आहे. रोज जेवण झाल्यावर हे एक चमचा मिश्रण खा. यानं अन्न चांगलं पचेल आणि जेवणानंतर वाटणारा जडपणा किंवा गॅसही दूर होईल. हे मिश्रण तुम्ही सकाळी उपाशीपोटी सुद्धा खाऊ शकता. सकाळी उपाशीपोटी हे खाल्ल्यानं दिवसभर डायजेशन सिस्टीम अॅक्विट राहणार. हे मिश्रण तुम्ही कोमट पाण्यात टाकूनही पिऊ शकता.

जिऱ्याचे फायदे

जिऱ्यामध्ये पचनक्रिया चांगली करण्याचे अनेक गुण असतात. यानं शरीरात पचनासाठी आवश्यक एंझाइम्स वाढतात. त्याशिवाय यानं पोटातील सूजह शांत राहते आणि आतड्यांमध्ये गॅस तयार होणं कंट्रोल होतं. 

ब्लोटिंग दूर करते बडीशेप

ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या दूर करण्यसाठी बडीशेप एक बेस्ट पर्याय आहे. पोटात तयार झालेला गॅस बाहेर काढण्यासही बडीशेप मदत करते. बडीशेपमध्ये व्हिटामिन सी आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात. या तत्वांमुळे पोटाला थंडावा मिळतो, पचन सुधारतं आणि ब्लोटिंगही दूर होते.

धणे पचनक्रिया सुधारतात

पोट फुगणे किंवा गॅस होणे या दोन्ही पचनासंबंधी समस्या आहेत. जर पचन व्यवस्थित झालं नाही तर या समस्या कधीही होतात. धणे पचनक्रिया चांगली होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. धण्यामुळे पोटातील जास्तीचा गॅस बाहेर पडतो आणि पोटाला आराम मिळतो.

गुणकारी ओवा

ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं, ज्यामुळे अन्न पचन चांगल्या पद्धतीनं होतं. तसेच ओव्यानं लघवी नॅचरलपणे वाढते सुद्धा. ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात. वॉटर रिटेंशन कमी करण्यासाठी आणि पोट फुगणं दूर करण्यासाठी ओवा बेस्ट उपाय आहे.

Web Title: Home remedies to get rid of bloating and gas problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.