Gas Problem : गॅसची समस्या बऱ्याच लोकांना नेहमीच होते. गॅस झाला तर पोट फुगतं. तशी तर ही एक कॉमन समस्या आहे. पण यामुळे दिवसाचं रूटीन किंवा वेगवेगळी कामं विस्कळीत होतात. अशात बरेच लोक ही समस्या दूर करण्यासाठी औषधं घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही घरगुती उपाय करूनही आपण ही (How to get rid of from gas) समस्या दूर करू शकता. असेच काही सोपे आणि गुणकारी उपाय आपण पाहणार आहोत.
गॅस पळवण्याचे सोपे उपाय
जर आपल्याला नेहमीच गॅसची समस्या होत असेल, पोट फुगत असेल तर सगळ्यात आधी दिवसभर भरपूर पाणी प्या. आपण नारळ पाणी, लिंबू पाणी, दही-ताक या गोष्टींचाही आहारात समावेश करू शकता. या गोष्टींमुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं आणि गॅस बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
काही भाज्या टाळाव्या
वेगवेगळ्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. पण काही भाज्यांमुळे काही लोकांना गॅसची समस्या होऊ शकते. गॅसची समस्या टाळायची असेल तर काही बीन्स, डाळी, ब्रोकली, फुलकोबी या गोष्टी टाळल्या पाहिजे. या गोष्टींमुळे गॅसची समस्या अधिक वाढते.
ब्रेक घेत घेत खा
दिवसातील तीन मुख्यवेळी आहार घेण्याऐवजी दिवसातून थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं खावं. असं केल्यास गॅसचा धोका कमी होतो. तसेच या उपायानं दिवसभर हलकं वाटेल आणि अॅक्टिवही रहाल. तसेच जे काही खाल ते बारीक चावून खाल्लं पाहिजे. घाईघाईनं खाल तर गॅसची समस्या होईल.
फिजिकल अॅक्टिविटी
रोज कोणती ना कोणती फिजिकल अॅक्टिविटी केली पाहिजे. हलका-फुलका व्यायाम केला पाहिजे. असं केल्यानं पचन तंत्र चांगलं राहतं. ज्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या होण्याचा धोका कमी असतो.