Join us
Daily Top 2 Weekly Top 5

जेवताना रोज १ चमचा 'ही' चटणी खा; शरीरात साचलेलं घातक युरीक एसिड भरकन होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:04 IST

Home Remedies For Uric Acid Chutney For Reduce High Uric Acid : ही चटणी खाल्ल्यानं शरीरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होईल.

आजकाल युरीक एसिड (Uric Acid) वाढण्याची समस्या अनेकांना उद्भवते.  शरीरातील युरिक एसिड वाढलं की सांध्यांमध्ये वेदना उद्भवतात. चालायला किंवा फिरायला त्रास होतो. युरिक एसिडच्या समस्येनं तुम्ही त्रासला असाल तर एक घरगुती चटणी तुमचं काम सोपं करू शकते. ही चटणी खाल्ल्यानं शरीरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होईल. (Home Remedies For Uric Acid Chutney To Reduce High Uric)

 युरिक अ‍ॅसिड कमी करणारी हे चटणी कशी करतात?

ही हिरवी चटणी घरच्याघरी करणं एकदम सोपं आहे. यासाठी तुम्हाला कोथिंबीर, पुदिन्याची पानं, तुळशीची पानं, कडुलिंबाची पानं हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी वर नमूद केलेली सर्व पानं घेऊन व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्या.

नंतर सर्व पानं व्यवस्थित चिरून घ्या. त्यात मिरची, आलं, लसूण बारीक चिरून घाला मग ब्लेंडरमध्ये घालून व्यवस्थित वाटून घ्या. त्यानंतर यात लिंबाचा रस किंवा मीठ मिसळा. यात तुम्ही काळी मिरी पूड घालू शकता. तयार आहे सोपी चटणी.  ही चटणी तुम्ही  दही किंवा सॅलेडसोबत खाऊ शकता. ही चटणी खाल्ल्यानं तुम्हाला काही दिवसांतच फरक दिसून येईल. यामुळे फक्त युरिक एसिड कमी होणार नाही तर सांधेदुखी, सूज कमी होते, पचनक्रिया चांगली राहते तसंच इम्युनिटी वाढण्यासही मदत होते.

शरीरातील युरिक अ‍ॅसिड का वाढतं?

सोडा, कोल्डड्रिंक्स, कृत्रिम साखर असलल्या पेयांमुळे शरीरात युरीक एसिड वेगानं तयार होते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास किडनी टाकाऊ पदार्थ बाहेर काढू शकत नाही यामुळे युरीक अ‍ॅसिड वाढतं.  जास्त वजन असलेल्या व्यक्तीच्या शरीरात युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन अधिक होते आणि किडनीला ते बाहेर काढणं कठीण जातं. जास्त प्रमाणात प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यानंही  युरिक अ‍ॅसिड वाढते

 हायपोथायरॉईडीझम किंवा रक्तातील साखर वाढल्यामुळे ही समस्या अधिक उद्भवते. जर  कुटूंबात  कोणालाही हा त्रास असेल तर तुम्हालाही होण्याची शक्यता असते. काही उच्च रक्तदाबाची औषधं घेतल्यामुळे युरीक एसिडची पातळी वाढू शकते. म्हणून आहार आणि जीवनशैली संतुलित ठेवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat This Chutney Daily to Reduce Uric Acid Quickly

Web Summary : Suffering from uric acid? This homemade chutney of coriander, mint, basil, and neem leaves helps reduce uric acid, joint pain, and inflammation, improves digestion, and boosts immunity. High uric acid can also be caused by sugary drinks and too much protein.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल