बदलत्या वातावरणासह शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. बरेच लोक असे असतात ज्यांना सकाळी उठल्यानंतर पोटाच्या समस्या जाणवतात. ज्यामुळे संपूर्ण दिवस आळसवाणा वाटतो. सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं, फक्त गॅस पास होतो पण पोट साफ होत नाही, शरीर जड वाटतं असा अनुभव अनेकांना येतो. (Home Remedies For Constipation)
पचनक्रिया खराब झाल्यामुळे या प्रकारचे त्रास वारंवार उद्भवतात. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, रात्री विलंबाने जेवणं, व्यवस्थित झोप न होणं किंवा पाणी कमी पिणं यामुळेही पचन बिघडते. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही बिघडलेली पचनक्रिय चांगली करू शकता. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी लावल्या तर तुम्हाला सकाळी पोट साफ होण्यात अडचण येणार नाही. (Constipation Home Remedies)
बडीशेपेचं पाणी प्या
जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटत असेल आणि तुम्ही या त्रासानं हैराण असाल तर बडीशेपेचं पाणी पिऊ शकता. बडीशेपेचं पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते.
लिंबू पाणी प्या
सकाळी उठल्यानंतर ग्लासभर कोमट पाण्यात १ लिंबू पिळून तुम्ही या पाण्याचे सेवन केले तर तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. शरीरातील टॉक्सिन्स निघून जातील तसंच पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होईल.
फायबर्सयुक्त आहार घ्या
जर तुम्ही सकाळी खूपच हेवी आहार घेत असाल तर तुमचं बिघडू शकतं. जर तुम्हाला पोटाचे आरोग्य हेल्दी ठेवायचं असेल तर फायबर्सबेस्ड डाएट घ्या. तुम्ही सकाळी जितका हलका आणि फायबर्स, प्रोटीनयुक्त आहार घ्याल तितकंच तुम्ही हेल्दी राहाल.
पुदिन्याचा चहा प्या
बऱ्याच लोकांना सकाळी चहा पिण्याची सवय असते. पुदिन्याचा चहा प्यायल्यानं पोटाचं आरोग्य चांगले राहते तसंच पोट हलकं राहण्यासही मदत होते.
नेहमी हायड्रेट राहा
काहीजण कामात व्यस्त असल्यामुळे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य खराब होऊ शकतं. तब्येत चांगली ठेवण्यासाठी कायम हायड्रेट राहा. सकाळी उठल्यानंतर ग्लासभर पाणी पिऊन मगच दिवसाची सुरूवात करा.
