Join us

तासंतास बेडवर पडून राहूनही येत नसेल झोप, तर लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:26 IST

Sleeping Problems: जर रोज तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर आरोग्यासंबंधी गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला लगेच आणि चांगली झोप येऊ शकते. 

Sleeping Problems: झोप न येण्याच्या समस्येने आजकाल भरपूर लोक पीडित असतात. बरेच लोक रोज रात्री बेडवर पडून असतात आणि झोप येण्याची वाट बघत बसतात. पण झोपेचा काही पत्ता (Sleeplessness) नसतो. अर्थात रात्री जर झोप पूर्ण झाली नाही तर पुढचा पूर्ण दिवस आळस आणि थकव्यात जातो. दिवसभर काम करता करता डुलक्या येऊ लागतात. यावर डॉ. शालिनी सिंह साळुंखे सांगतात की, जर रोज तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर आरोग्यासंबंधी गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला लगेच आणि चांगली झोप येऊ शकते. 

गाढ झोप येण्यासाठीचे उपाय

डॉक्टरांनी सांगितलेल्या काही गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला रोज बेडवर पडल्या पडल्या गाढ झोप लागू शकते. रात्री खासकरून या खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

- रात्री चांगली झोप येण्यासाठी 7 ते 8 वाजता दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे. फार जास्त जड काही न खाता हलकं काहीतरी खावं.

- 8 वाजतानंतर पूर्ण घरातील लाइट डिम ठेवा. प्रकाश कमी असेल तर झोप लवकर लागेल.

- रात्रीचं जेवण झाल्यानंतर मेंदू एक्साइट होईल असं काही करू नका. जसे की, हॉरर सिनेमा बघणे किंवा ऑफिसचं काम करणे. त्याऐवजी मेंदू शांत होईल अशी कामं करा. जसे की, पुस्तक वाचा, पेटिंग करा.

- झोपण्याआधी दिवसभर तुम्ही काय केलं ते लिहून काढा. दिवसातील 5 चांगल्या घटनांबाबत लिहा. यानंही तुम्हाला झोप येण्यास मदत मिळेल.

- रात्री चांगली झोप येण्यासाठी तुम्ही झोपतेवेळी शांत म्युझिक ऐकू शकता. यानं तुम्हाला चांगली झोप येईल.

इतरही काही टिप्स

- रोज झोपेची वेळ एकच असणं फार महत्वाचं असतं. रोज जर झोपण्याची वेळ फिक्स असेल तर वेळ झाल्यावर तुम्हाला आपोआप झोप येईल.

- रात्री झोपण्याआधी मद्यसेवन, कॅफीन जसे की, कॉफी, चहा पिऊ नये. यामुळे झोपमोड होते.

- जर झोपण्याआधी एखादी हलकी एक्सरसाईज कराल तर यानं चांगली झोप येण्यास मदत मिळेल. 

- दिवसा जास्त झोप घेऊ नका. दिवसा एका तासांपेक्षा जास्त झोपाल तर रात्री झोप येणार नही.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स