Ayurvedic remedies for gas : पोटात गॅस होणे किंवा पोट फुगणे ही आजकाल खूपच सामान्य समस्या आहे. बहुतेक लोकांना ही तक्रार जेवणानंतर जाणवते. जेव्हा आपली पचनसंस्था नीट काम करत नाही किंवा आपण चुकीचे अन्न खातो, तेव्हा गॅस, जडपणा आणि अस्वस्थता सुरू होते. या त्रासातून आराम मिळवण्यासाठी बरेच लोक औषधे घेतात, पण अनेकदा त्याचा परिणाम होत नाही. अशा वेळी आयुर्वेदिक घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात.
आयुर्वेदिक उपाय
डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोटात गॅस होण्याच्या समस्येसाठी एक सोपा पण प्रभावी उपाय सांगितला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या उपायाचा परिणाम पहिल्याच वेळी दिसू शकतो.
साहित्य
अर्धा छोटा चमचा गायीचं तूप
2 चिमूट सैंधव मीठ
2 चिमूट हिंग
कृती आणि सेवन करण्याची पद्धत
एका छोट्या भांड्यात अर्धा चमचा गायीचं तूप घ्या. त्यात 2 चिमूट सैंधव मीठ आणि 2 चिमूट हिंग घाला. सर्व नीट मिसळून एक लहान चटणीसारखं मिश्रण तयार करा. हे मिश्रण जेवण करण्यापूर्वी लगेच खा. ज्यांना गॅस, पोट फुगणे किंवा अफारा होतो, त्यांच्या साठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.
हिंगाचे फायदे
हिंग पचनासाठी आवश्यक एन्झाईम्स सक्रिय करते, ज्यामुळे अन्न पटकन पचतं. हे आतड्यांचं कार्य सुधारतं. हिंग गॅस, पोटदुखी, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यावर उपयोगी आहे.
सैंधव मिठाचे फायदे
सैंधव मीठ पचनसंस्था मजबूत करते. हे आतड्यातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे भूक वाढते आणि अपचन, पोट फुगणे यासारख्या तक्रारी कमी होतात. हा उपाय दिवसातून फक्त एकदाच, जेवणाआधी घ्यावा. जर समस्या कायम राहिली, तर डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
