Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लघवी रोखून धरण्याची सवय फार घातक, किडनी डॅमेज होतेच पण ‘या’ मोठ्या आजारांचाही धोका

लघवी रोखून धरण्याची सवय फार घातक, किडनी डॅमेज होतेच पण ‘या’ मोठ्या आजारांचाही धोका

Holding Urine Side Effects : मुळात शरीर आपल्याला संकेत देत असतं की, कधी लघवी करावी. पण जेव्हा आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ही सवय हळूहळू गंभीर आजारांचं कारण ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:04 IST2026-02-11T10:32:50+5:302026-02-11T16:04:43+5:30

Holding Urine Side Effects : मुळात शरीर आपल्याला संकेत देत असतं की, कधी लघवी करावी. पण जेव्हा आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ही सवय हळूहळू गंभीर आजारांचं कारण ठरू शकते.

Holding urine for long time can damage kidney, know how dangerous urine holding side effects | लघवी रोखून धरण्याची सवय फार घातक, किडनी डॅमेज होतेच पण ‘या’ मोठ्या आजारांचाही धोका

लघवी रोखून धरण्याची सवय फार घातक, किडनी डॅमेज होतेच पण ‘या’ मोठ्या आजारांचाही धोका

Holding Urine Side Effects : आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करत असतो. ऑफिसमधील मीटिंग, लांबचा प्रवास, शाळा किंवा कॉलेज क्लास किंवा जवळ वॉशरूम नसणे अशा कितीतरी स्थितींमध्ये आपण लघवी बराच वेळ रोखून ठेवतो. काही वेळेला आपण मु्द्दामहून लघवी रोखून ठेवतो, असा विचार केला जातो की, थोड्या वेळाने जाऊया. पण आपल्याला माहीत नसेल की, पुन्हा पुन्हा असं करणं आणि जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने आरोग्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं.

मुळात शरीर आपल्याला संकेत देत असतं की, कधी लघवी करावी. पण जेव्हा आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ही सवय हळूहळू गंभीर आजारांचं कारण ठरू शकते. खासकरून किडनी, ब्लॅडर आणि पूर्ण यूरिनरी सिस्टीमसाठी ही सवय घातक ठरू शकते. अशात आज आपण हे समजून घेणार आहोत की, जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने किडनी कशी डॅमेज होऊ शकते आणि इतरही कोणत्या आजारांचा धोका होऊ शकतो.

किडनीसाठी घातक सवय

एक्सपर्ट सांगतात की, किडनी सतत रक्त साफ करण्यासाठी लघवी तयार करते. जेव्हा आपण लघवी रोखतो, तेव्हा ती यूरिन ब्लॅडरमध्ये जमा होते. जर हा दबाव जास्त काळ राहिला, तर हा दबाव उलट किडनीकडे जातो. ज्यामुळे किडनीवर प्रेशर येतं आणि किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. लघवीच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन, बॅक्टेरिया आणि अतिरिक्त मीठ बाहेर काढलं जातं. जर लघवी रोखून धराल तर हे विषारी तत्व बाहेर पडणार नाहीत आणि शरीरात जमा होतील. ज्यामुळे किडनीला जास्त मेहनत करावी लागेल आणि किडनीच्या कोशिका हळूहळू कमजोर होतील.

कोणत्या आजारांचा धोका?

यूटीआय इन्फेक्शन

जेव्हा आपण जास्त वेळ लघवी रोखून ठेवतो, तेव्हा त्यातील बॅक्टेरिया बाहेर पडू शकत नाहीत. हे बॅक्टेरिया मूत्रमार्गात वाढू लागतात आणि यूरिनरी ट्रॅक्स इन्फेक्शन होऊ शकतं. यूटीआयच्या लक्षणांमध्ये लघवीमध्ये जळजळ, पुन्हा पु्न्हा तहान लागणे, लघवी कमी येणे, लघवीतून दुर्गंधी, पोट किंवा कंबरदुखी यांचा समावेश आहे. महिलांना यूटीआय इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. पण पुरूषही याने प्रभावित होऊ शकतात.

किडनी स्टोन

जेव्हा आपण कमी पाणी पितो आणि लघवी रोखून ठेवतो, तेव्हा लघवी घट्ट होते. लघवीमध्ये मिनरल्स जमा होऊ लागतात आणि यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. किडनी स्टोन झाल्यास असह्य वेदना होतात, उलटी होते आणि लघवीतून रक्त येणे अशा समस्या होतात. अनेक केसेसमध्ये तर सर्जरी सुद्धा करावी लागते.

ब्लॅडरचे स्नायू कमजोर होतात

नेहमीच लघवी रोखून ठेवल्याने ब्लॅडरच्या स्नायूंवर अधिक दबाव रडतो. यामुळे नंतर लघवी कंट्रोल करण्यास अडचण, लघवी आपोआप निघणे, पुन्हा पुन्हा लघवी लागणे अशा समस्या होऊ शकतात. याला ब्लॅडर डिसफंक्शनही म्हटलं जातं.

काही लोकांसाठी लघवी रोखून ठेवणं खूप जास्त घातक ठरू शकतं. जसे की, प्रोस्टेट वाढल्याची समस्या असणारे पुरूष, डायबिटीसचे रूग्ण, आधीच किडनीचा आजार असणारे लोक, लघवीची समस्या असणारे लोक या लोकांनी लघवी रोखून ठेवल्यास किडनी डॅमेज होण्याचा धोका फार जास्त असतो.

Web Title : पेशाब रोकना खतरनाक: गुर्दे की क्षति और अन्य खतरे।

Web Summary : पेशाब को बार-बार रोकने से गुर्दे, मूत्राशय और मूत्र प्रणाली को नुकसान हो सकता है। इससे यूटीआई संक्रमण, गुर्दे की पथरी और मूत्राशय की शिथिलता हो सकती है। उच्च जोखिम वाले व्यक्तियों को इस आदत से बचना चाहिए।

Web Title : Holding urine too long is dangerous: Kidney damage and other risks.

Web Summary : Regularly holding urine can harm kidneys, bladder, and urinary system. It may cause UTI infections, kidney stones, and bladder dysfunction. High-risk individuals should avoid this habit.