Join us

गाई, म्हशीच्या दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळेल; रोज 'हा' पदार्थ खा, मजबूत होतील हाडं अन् दात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 17:25 IST

Highest Calcium Foods For Strong Bones : पालकामध्ये लोह आणि कॅल्शियम दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळतात.

शाकाहारी लोक कॅल्शियमसाठी दुधावर अवलंबून असतात. पण तुम्हाला माहिती आहे का दुधातून किती कॅल्शियम मिळतं. कॅल्शियम हाडांना मजबूती देण्यासाठी फायदेशीर ठरतं. गाई म्हशींच्या दुधापेक्षा अनेक पदार्थांमध्ये कॅल्शियम जास्त असते (Highest Calcium Foods For Strong Bones). ज्याला इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाऊंडेशननं हाडं आणि सांध्यांसाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. पण तुम्हाला माहिती असायला हवं की कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा. (Highest Calcium Foods For Strong Bones And Joints That Increase More Calcium Than Milk)

एका दिवसांत किती कॅल्शियम खायला हवं?

महिलांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका जास्त असतो. १९ ते ७० वर्ष वयोगटातील वयस्कर पुरूषांनी दिवसाला १०० एमजी कॅल्शियम खायला हवं. दर दिवशी पुरूषांना १२०० एमजी कॅल्शियमची आवश्यकता असते. ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडं कमकुवत होतात आणि फॅक्चरचा धोका वाढतो (Ref).आयओएफच्या रिपोर्टनुसार गाय, म्हशीचे २०० एमएल दूध प्यायल्यानं  २४० एमजी कॅल्शियम मिळते. पण चीजचा ३० ग्रॅम तुकडा खाल्ल्यानं २४० एमजी कॅल्शियम मिळते.

हात खराब न करता 2 मिनिटांत मळून होईल पीठ; १ सोपी ट्रिक, मऊसूत-फुगलेल्या होतील चपात्या

कोणत्या पदार्थांतून सर्वात जास्त कॅल्शियम मिळते

चीझ अनेक प्रकारचे असतात यात कॅल्शियमचे प्रमाण कमी जास्त असते. आयओएफच्या रिपोर्टनुसार हार्ड चीझच्या ३० ग्रॅम तुकड्यामधून २४० एमजी कॅल्शियम मिळते. चेडर, पार्मेसन, Emmental आणि Gruyere हे इतर प्रकार आहेत.

चीझमध्ये कॅल्शियमचे प्रमाण किती असते?

200 ग्रॅम ताज्या चीझमध्ये १३८ एमजी, ६० ग्रॅम Camembert, Brie सारख्या सॉफ्ट पदार्थांमध्ये २४० एमजी असते, ६० ग्रॅम फेटलेल्या चीजमध्ये २७० एमजी, ५० ग्रॅम मोजरेला चिझमध्ये २४२ एमजी कॅल्शियम तर ३० ग्रॅममध्ये १८० एमजी कॅल्शियम असते. पण फक्त कॅल्शियम घेतल्यानं हाडं मजबूत होत नाही यासाठी व्हिटामीन डी घेणंसुद्धा गरजेचं आहे. कारण यामुळे शरीरातील पोषक तत्वांचे अवशोषण वाढते यासाठी सकाळच्या उन्हात नक्की जा.

केसांची वाढच खुंटली-पातळ झालेत? 'हे' खास तेल लावा; लांब-दाट केसांचं गुपित

पालकामध्ये लोह आणि कॅल्शियम दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळतात. मेथीची भाजी, पराठे किंवा इतर पदार्थ कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत. ब्रोकोलीमध्ये केवळ कॅल्शियमच नाही, तर व्हिटॅमिन सी आणि के देखील असतात. याशिवाय तीळ हे कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. एक चमचा तिळात जवळपास 88 मिलीग्राम कॅल्शियम असते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल