High Protein Can Damage Kidney : शरीरानं व्यवस्थित काम करण्यासाठी प्रोटीनची खूप गरज असते. प्रोटीन शरीरात महत्वाची भूमिका निभावतं. याच्या मदतीनं स्नायू तयार होतात, टिश्यूज रिपेअर होतात आणि आरोग्यही चांगलं राहतं. अलिकडे वेगवेगळ्या कारणांसाठी लोक खूप जास्त प्रोटीन इनटेक करत आहेत. पण असं असूनही प्रोटीन जास्त प्रमाणात घेणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं.
अलिकडेच एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जास्त प्रोटीन इनटेकमुळे किडनी डॅमेज होण्याचा धोका वाढतो. आज आपण या लेखात हेच पाहणार आहोत की, प्रोटीन किडनी डॅमेजचं कारण कसं ठरू शकतं.
कसा होतो प्रभाव?
प्रोटीनमधून निघालेल्या विषारी तत्वांना बाहेर काढण्यासाठी किडनी ब्लड फिल्टर करतात, नंतर या वेस्ट रूपांतर किडनी लघवीमध्ये करतात. प्रोटीन तुटल्यानंतर शरीर नायट्रोजनयुक्त वेस्ट प्रॉडक्ट्स प्रोड्यूस करतं, जे किडनींना बाहेर काढायचं असतं.
पण जेव्हा प्रोटीनचं इनटेक वाढतं, तेव्हा यामुळे नायट्रोजन वेस्ट प्रॉडक्शन आणि किडनीचं काम दोन्ही वाढतं. या स्थितीत हेल्दी किडनी असणारे लोक हा दबाव सहन करू शकतात, पण ज्यांना आधीच किडनीसंबंधी समस्या आहेत, त्यांना जास्त प्रोटीनमुळे समस्या होऊ शकतात.
संशोधनातून खुलासा
याबाबत अनेक संशोधनं समोर आली आहेत. National Library of Medicineवर प्रकाशित एका रिपोर्टमधून समजलं की, हेल्दी किडनी हेल्दी असणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रोटीन इनटेकनं नुकसन होत नाही. जे नियमित व्यायाम करतात, खेळाडू आहेत, वजन नियंत्रित आहे, जे हाय प्रोटीन डाएट घेतात त्यांना किडनीसंबंधी कोणत्याही समस्यांची लक्षणं दिसत नाहीत.
पण ज्या लोकांना किडनीसंबंधी समस्या आहेत, त्यांना जास्त प्रोटीनमुळे नुकसान होऊ शकतं. जास्त काळ हाय प्रोटीन इनटेक केल्यास किडनी डॅमेजचा धोका वाढू शकतो. सोबतच यामुळे प्रोटीनुरिया प्रोड्यूस होतो, जो किडनी डॅमेजचा संकेत आहे.
संशोधनातून सांगण्यात आलं की, मीट आणि डेअरी प्रॉडक्टमध्ये आढळणारे प्रोटीनचे अॅनिमल सोर्स, प्लांट बेस्ड प्रोटीन, जसे की, बीन्स, नट्स आणि डाळींच्या तुलनेत किडनीत डॅमेजचा धोका अधिक वाढवतात. जेव्हा लोक मांसातून प्रोटीन मिळवतात तेव्हा शरीरात अॅसिड लेव्हल आणि फॉस्फेटचं प्रमाण वाढतं, ज्याचा किडनीच्या कार्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो.
कुणाला जास्त धोका?
क्रॉनिक किडनी डिजीज (सीकेडी), डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर असणारे लोक आण ज्यांना किडनीसंबंधी आजार होण्याचा धोका अधिक आहे, त्यांनी प्रोटीन इनटेकबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. सोबतच ज्यांची किडनी ट्रांसप्लांट झाली आहे आणि वृद्ध लोकांनी सुद्धा प्रोटीन इनटेकवर लक्ष दिलं पाहिजे.